अहेरी:-तालुक्यातील कमलापूर येथे पहिल्यांदाच आयोजित नल्ला पोचम्मा बोनालू कार्यक्रमाला माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी उपस्थित राहून विधिवत पूजा करत आशीर्वाद घेतले.
कमलापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये पहिल्यांदाच नल्ला पोचम्मा बोनालू उत्सव साजरा केला जात आहे.या उत्सवाच्या निमंत्रणाला मान ठेऊन माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी उपस्थित राहून विधिवत पूजा करत आशीर्वाद घेतले.
यावेळी कमलापूर येथील ग्रामपंचायत सदस्य वेंकटेश कडार्लावार,क्रिष्णा कीर्तीवार,वेंकटी उलेनंदला,स्नेहदीप आत्राम,बकय्या चौधरी,नरेंद्र चौधरी कमिटी चे सदस्य तसेच प्रभागातील महिला,पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.