अकोला - आज दि.04 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचे सुपुत्र तथा संसदरत्न युवा खासदार डॉ. श्री. श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस* असून त्याना दीर्घायुष्य प्राप्ती व उत्तम स्वास्थसाठी श्री राजराजेश्वर मंदिर येथे राजेश्वर महाराज यांना दुग्ध अभिषेक करण्यात आले.
महाराष्ट्राच्या युवकांसाठी प्रेरणास्थान असलेले डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येतात तसेच महाराष्ट्राचे प्रश्न दिल्ली दरबारी अत्यंत आक्रमकपणे मांडून महाराष्ट्राच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत असणाऱ्या श्रीकांतजी यांना दीर्घायुष्य करिता अकोला जिल्हा व महानगर शिवसेना व महिला आघाडीच्या वतीने श्री राज राजेश्वर महाराज यांना दुधा अभिषेक करून प्रार्थना करण्यात आली यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अश्विनभाऊ नवले महिला आघाडी जिल्हाप्रमुख उषाताई विरक उपजिल्हा प्रमुख ,नगरसेवक शशिकांत चोपडे , महानगरप्रमुख योगेश अग्रवाल उमाताई शर्मा शहर प्रमुख रमेश गायकवाड रोशनी ताई श्रीनाथ, संघटक रवी भाऊ सागर पूर्णे उपशहर प्रमुख नितीन बदरखे दीपक नावकार प्रतीक मानेकर राजूभाऊ दांडेकर सह मोठ्या प्रमाणात शिवसेना व महिला आघाडी पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.