महसूल विभाग विविध प्रकारच्या अवैध वाहतुकीत अनेक वाहने पकडतात . ही वाहने महसूल विभाग येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवतात . त्यावर दंडात्मक कारवाई होते . दंडाची रक्कम न भरल्याने अनेक महिने , वर्षे ही वाहने उभी असतात . मात्र , ट्रॅक्टरचे अनेक पार्ट चोरीला गेल्याने शिवसेनेने महसूल विभागाविरोधात पोलिसात तक्रार केली आहे . विविध अवैध वाहतूक करताना महसूल विभागाने अनेक ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडले . त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे . मात्र , महसूल विभागाने जप्त केलेल्या ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट चोरीला गेले आहेत .
ट्रॅक्टर महसूल विभागाच्या ताब्यात तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात येतात . येथे सीसीटीव्ही आहे . मात्र , चोरीच्या घटना होत असून देखील महसूल विभागाने कोणतीच तक्रार पोलिसात केली नाही . चोरीला महसूल विभाग जबाबदार असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष श्री नरेंद्र नरड यांनी तक्रारीतून केली आहे .