अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत. *दि.८ ऑगस्ट २०२५ रोजी श्री शिवाजी महाविद्यालय अकोला, दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व ज्योती सावित्री ब्रिगेड अकोला तर्फे दिव्यांग बांधवांच्या संगणक प्रशिक्षणासाठी संस्थेला लॅपटॉप भेट देण्यात आला*. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे, दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे, सहसचिव डॉ.संजय तिडके, ज्योती सावित्री ब्रिगेड अकोलाच्या अध्यक्ष भारती शेंडे, माजी नगरसेविका वनिता राऊत व सुमित्रा निखाडे उपस्थित होत्या.*आपल्या प्रास्ताविकात विशाल कोरडे यांनी ग्रामीण विभागातील दिव्यांग व्यक्तींसाठी संगणक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले. सदर लॅपटॉपच्या माध्यमाने दिव्यांग व्यक्तींना संस्थेचे स्वयंसेवक घरी जाऊन संगणक प्रशिक्षण देणार आहेत. त्याचबरोबर पुणे मुंबई येथे अशा प्रशिक्षित दिव्यांगांना नोकरी देण्यासाठी ही संस्था प्रयत्न करत असल्याचे सांगितले*. ज्योती सावित्री ब्रिगेड अकोला च्या भारती शेंडे व मंदा रुखने यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन या राष्ट्रीयकृत संस्थेला लॅपटॉप देताना आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले. समाजातील सर्व घटकांनी संस्थेसोबत उभे राहून त्यांना भरभक्कम सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला, श्री शिवाजी महाविद्यालय अकोला व ज्योती सावित्री ब्रिगेड यांच्या माध्यमाने दिव्यांग बांधवांना जे महत्त्वपूर्ण साहित्य लागणार आहे ते पुरवण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमातून दिव्यांग सक्षमीकरणासाठी डॉ .विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याचेही त्यांनी व्यक्त केले. सौ भारती शेंडे व ज्योती सावित्री ब्रिगेडच्या सर्व महिलांनी डॉ.विशाल कोरडे व संस्थेतील सदस्यांना राख्या बांधून सामाजिक रक्षाबंधन साजरे केले. *येणाऱ्या गणेश उत्सव, नवरात्री व दिवाळीसाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन द्वारा विविध उत्पादने तयार केली जात असून दिव्यांग बांधवांच्या रोजगारासाठी ही उत्पादने खरेदी करावे असे आव्हान संस्थेच्या सदस्य अनामिका देशपांडे यांनी केले*. ज्या दिव्यांगांना या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी संस्थेच्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधावा अशी माहिती आपल्या आभार प्रदर्शनात सारिका उगले यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रीती राऊत, मंदाकिनी मांडवगडे,अनिता काल पांडे,उमा अढाऊ,रुपाली भड,शीतल भुस्कुडे,अरुणा पोफले,रोशनी तडस,दिक्षा बंड,तनु उगले,लता राखोंडे,कुमूदिनी वाघमारे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.