नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बांद्रा शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात केंद्रसरकार व राज्य सरकार हर घर तिरंगा हे अभियान राबवत आहे.समता, स्वातंत्र्य, न्याय,बंधुता, दर्जाची व संधीची समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता, वृद्धिंगत करणारे भारतीय संविधान आम्ही भारतांच्या लोकांनी दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पित केले हे संविधान दि.26 जानेवारी 1950 पासून अंमलात आले आहे या ऐतिहासिक घटनेला 73 वर्षे होत आहेत.त्यामुळे संविधानाची सखोल ओळख होण्यासाठी, लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी "हर घर संविधान" अभियान राबवून प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात संविधान सन्मान महोत्सव आयोजित करण्याची मागणी वैभव गिते यांनी केली.केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांना वैभव गितेंची संकल्पना आवडली असून रामदासजी आठवले यांनी आयुक्त समाजकल्याण पुणे व महासंचालक डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांना 26 नोव्हेंबर 2022 ते 26 नोव्हेंबर 2023 वर्षभर "हर घर संविधान" अभियान राबवून संविधान सन्मान महोत्सव आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. असी माहिती प्रसिद्धी प्रमुख पी एस खंदारे यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.
निवेदनावर राज्य सहसचीव पी.एस.खंदारे,राज्य कोषाध्यक्ष शिवराम कांबळे, राज्य महिला संघटक पंचशीला कुंभारकर,राज्य सहसंघटक शरद शेळके,राज्य निरीक्षक बी.पी.लांडगे,राज्य संघटक अम्पल खरात,राज्य निरीक्षक दिलीप आदमाणे,प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या सह्या आहेत.