ब्रम्हपुरी येथेच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात शाळेला सुरुवात झाली असून सर्वत्र शाळेची घटा वाजली आहे,प्रत्येक लहान मोठे शाळेत जाण्यासाठी सज्ज झाले असून त्यांना बघून छोट्या लहान चिमुकल्याची सुद्धा उत्सुकता वाढली आहे, आपला दादा ,ताई,भाऊ शाळेत जातं असल्याचे पाहून २, ते ४ वर्षाचे चिमुकले जे घरा घरात मोठ्यानं सारखे गुण करतात, त्यांना सुद्धा शाळेत जायची उत्सुकता दिसून येत आहे,मोठे विद्यार्थी अभ्यासासह मोबाईल हाताळतात पण चिमुकले सुद्धा मोठ्याना पाहून जसे मोठे वागतात तसे ते वागतात, प्रत्येक घरात लहान मुले आहेत ,ते मोठे कसा अभ्यास करतात त्यांना पाहून ते सुद्धा पाटी पुस्तक हाती घेऊन लिखाण करतात, आणि १, २ वन टू असे बोलतात यावरून त्यांना शाळेत जाण्याची उत्सुकता तर दिसून येते,परंतु आपण घरात जर वातावरण आणि लहान मुलांवर संस्कार शिक्षणाचे टाकले तर ते सुद्धा तेच संस्कार घेऊन उद्या फळाला येतात,म्हणून जसे आपण वागाल तसे ते वागतील असे म्हणणे वावगे ठरणार नाही, प्रत्येक मोठ्यांनी मोबाईल ऐवजी लहान चिमुकल्याना वही पुस्तक द्या, आणि आपल्या मुलाचे भविष्य घडवा, हाच प्रकुतीचा नियम आहे,