अकोला:- लोकसभेच्या निकालानंतर हे जेव्हा स्पष्ट झाले की भाजपला केवळ २४० सीट मिळणार आहे. त्यावेळी श्री मोदी,राजनाथसिंग,अमित शहा,आणि नड्डा यांनी विचारांती असा निर्णय घेतला की आपण विरोधी पक्षात बसायचे. आणि घटक पक्षांना तसे फोन करूनकळवण्यात आले की तुम्ही तुमचा निर्णय घेण्यास मोकळे आहात.
इंडी अलायंस ने राज्य करावे. तेव्हा सर्वप्रथम चिराग पासवान व शिंदे यांनी सांगितले की आम्ही तुमच्या निर्णयात सहभागी आहोत आम्ही पण विरोधी पक्षात बसायला तयार आहोत. तुम्ही इथे हे लक्षांत घ्या की मोदी पक्ष कार्यालयात दुपारी चार वाजता येणार होते पण ते संध्याकाळी उशिराने आले त्यामागचे हे कारण आहे.
दिल्लीतील सत्तेच्या दालनात वावर असणाऱ्या माझ्या एका मित्राने हा चित्तथरारक व अतिशय नाटकीय तसेच सर्वसामान्य माणसाच्या आवक्याच्या बाहेर असलेला घटनाक्रम मला दिनांक ५ जूनलाच सांगितला होता.
नायडू आणि नितीशला दुपारी मोदींनी फोन केला होता तो याच साठी केला होता की तुम्हारा तुम देखलो हमे कोई एतराज नहीं है. मोदींचा हा निर्णय ऐकल्यावर दोघांचीही हालत खस्ता झाली. थोडक्यात दोघेही थंडे पडले कारण त्यांना इंडी दलांची स्थिती माहिती होती. मोदींच्या या निर्णयाची बातमी इंडी दलाला कळेल अशी पण व्यवस्था करण्यात आली.
खडगे,जयराम रमेश यांना तर धक्काच बसला कारण ते मानसिक दृष्ट्या या स्थितीला फेस करायला तयारच नव्हते. तरी पण त्यांनी ही खबर बाहेर न येऊ देता शरद पवारांना फक्त नितीश आणि नायडू यांच्याशी बोलायला लावले.त्यांच्या विनंतीनुसार पवार काकांनी नितीश यांना फोन लावला.
तेव्हा नितीशनी शरद पवारला विचारले की तुम्हाला कसे कळले की मोदी विरोधी पक्षात बसायला तयार झाले आहेत म्हणून? शरद पवार नितीशला म्हणाले की मला हे नाही कळले आहे. मला फक्त तुमच्याशी संपर्क साधायला सांगितले आहे. तेव्हा नितिशजी नी शरद पवारांना सगळे सांगितले,आणि हे देखील विचारले की सर्वांच्या खात्यात ८५०० रू द्यावे लागतील,संपत्तीचे वाटप मागास प्रवर्गातील लोकांना करावे लागेल हे दोन मोठे आश्वासन काँग्रेसनी लोकांना दिले आहे.सगळ्यात महत्वाचे म्हणजे पंतप्रधान कोण होणार आहे? हे ऐकून पवारांच्या लक्षांत आले की आपल्याला अंधारात ठेवण्यात आले आहे त्यांचा दिमाख खराब झाला त्यांनी सर्वप्रथम अखिलेश यादव यांना फोन करून हे सांगितले की भाऊ असा प्रकार घडला आहे आणि काँग्रेस आपल्याला अंधारात ठेऊन काहीतरी कारस्थान करीत आहे. एवढे घडल्यावर पवारांनी खडगे यांना फोन करून फैलावर घेतले की तुम्ही मला हे का नाही सांगितले की भाजप ने विरोधी पक्षात बसायची तयारी केली आहे म्हणून, तेव्हा खडगें पवारांना म्हणाले की अहो उडत उडत बातमी आली होती त्यामुळे सांगितले नाही.त्यावर पवार यांनी खडसावले की आधी पंतप्रधान ठरवा आणि मगच पुढे सरकू,दरम्यान अखिलेश यादवनी पण खडगे यांना फोन करून सांगितले की मला विचारल्या शिवाय काही करायचे नाही,नाही तर मी एकटा वेगळा बसेन.ही बातमी इंडी गठबंधन मध्ये पसरली अजून निकाल येतच होते पण सर्वत्र दाणादाण उडाली.
इंडी दलाला सर्वात मोठा प्रॉब्लेम हा होता की प्रती व्यक्ती ८५००रू/महिना आणि श्रीमंत लोकांचे पैसे घेऊन त्याचे मागास प्रवर्गात वाटप कसे करायचे कारण काँग्रेसने खटाखट पैसे देण्याचे आश्वासन दिले होते.
पडद्याच्या आड जबरदस्त उठपटक चालू झाली होती.इंडी दलाला तर जाऊ द्या नायडू आणि नितीश कुमार यांना सुद्धा मोदी,शहा,असा निर्णय घेतील अशी अपेक्षाच नव्हती.
नितीश कुमारांनी आणि चंद्राबाबूंनी आपल्या संपर्कातील भाजपच्या बड्या नेत्यांना फोनवर गाठले आणि त्यांना आश्वासन दिले की आम्ही भाजप बरोबरच राहू इच्छितो मोदींनी ताबडतोब सरकार स्थापन करावे.
भाजपचे २४०आणि पासवान, शिंदे,मिळून आणि अन्य छोटे सहकारी मिळून संख्याबळ २६४ होते. येवढा तगडा विपक्ष असताना आम्ही इंडी गठबंधन सोबत युती करणार नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मोदी शहा विरोधात बसून काही भजन करणार नव्हते हे नक्की होते.
इकडे मोदी आणि शहा यांना जयंत चौधरीच्या मार्फत इंडी गठबंधन मधील गोंधळ कळलाच होता.
उत्तर प्रदेश आणि कर्नाटक मध्ये भाजप ने मुस्लिम वर्गात हवा सोडून दिली की काँग्रसचे सरकार आले आहे आणि बँकेत सगळ्यांना ८५००रू/ मिळणार आहे. त्यामुळे बंगलोर आणि लखनौ मध्ये बँकामध्ये मुस्लिम महिलांच्या रांगा लागल्या होत्या.
इंडी गठबंधनच्या नेत्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला की आपण जर सरकार स्थापन केले तर आपल्याला आश्वासन दिल्याप्रमाणे खटाखट १०००००रू/ प्रती वर्ष पैसे तर द्यावेच लागतील भलेही समान संपत्तीचे वाटप काही काळानंतर करू असे आपण सांगू शकतो पण हे ८५००रू/ प्रती माह कसे द्यायचे? त्यामुळे पंतप्रधान होणे म्हणजे सुळावरची पोळी ठरेल.महिलांची अर्धी लोकसंख्या जरी धरली तरी प्रती महिला एक लाख याप्रमाणे साठ लाख कोटी रु प्रती वर्ष होतात.आणि इकडे तर लोक बँकेत पण येणं सुरू झाले आहे.भाजप ने हवा अशीच पसरवली की बँक मे जाओ ओर पैसे ले लो.
त्यावर असा मार्ग निघाला की मग असे करू की नितीश आणि नायडूनी आम्हाला म्हणजे इंडी दलाला समर्थन द्यायचे काँग्रेस सुद्धा बाहेरून पाठिंबा दिल्यासारखे दाखवेल सरकार मध्ये सामील होणार नाही म्हणजे हे पैसे देणे आणि संपत्तीचे समान वाटप करण्याचां प्रश्नच उरत नाही. काँग्रेस सांगायला मोकळी होईल की आमचे सरकार नाही आहे आमचे म्हणणे ऐकत नाही म्हणून आम्ही सरकार मध्ये सामील झालो नाही असे जनतेला सांगता येईल. म्हणजे काँग्रेस पुन्हा आपली जनतेत प्रतिमा उजळ ठेऊन चीत भी मेरी पट भी मेरी गेम खेळत होती.
तेव्हा नितीश आणि नायडू यांनी ठामपणे सांगितले की बाहेर राहून समर्थन देण्याचा काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड काही चांगला नाही आहे त्यांनी असेच चरणसिंग,चंद्रशेखर,दैवेगोडा,गुजराल यांना बाहेरून पाठिंबा दिला होता आणि नंतर अचानक काढून घेतला होता आणि या सगळ्यांचे सरकार काही दिवसातच पाडले होते. आम्ही तुमच्या सोबत येत नाही,आणि तिकडे एवढा जबरदस्त विपक्ष घेऊन मोदीजी शांत बसणार नाहीत.एवढेच नव्हे तर बिहार मध्ये भाजप समर्थन काढून घेईल ते वेगळेच आणि बिहार मध्ये तेजस्वीचा मुख्यमंत्रीपदी आधीपासूनच क्लेम होताच त्यामुळे नितीश कुमार समोर इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती होती. विचार करा निकाल लागणे चालू असताना किती वेगवान राजनैतिक घटनाक्रम पडद्याआड चालू होता. त्यामुळे नितीश कुमार व नायडू थंड पडले आणि त्यांनी मोदी व शहांना सरकार तुम्हीच स्थापन करावे आम्ही अगदी तुमच्या सोबतच राहू असे कळकळीचे आवाहन केले व आश्वासन दिले.
गुज्जुभाई मनातल्या मनात हसले त्यांनी हे सगळे मुद्दामच नाटक केले होते. त्यांना एकतर इंडी दलाला आणि सगळ्या स्टेक होल्डर लोकांना ८५००रू प्रतीमाह आणि संपत्तीचे समान वाटप ही त्यांची घोषणा कशी बोगस आहे हे दाखवायचे होते. तसेच तो येणाऱ्या इंडी गठबंधन सरकार साठी कसा गळ्यातील फास आहे हे दाखवून द्यायचे होते. त्याचवेळी एनडीए मधील जे हे दोन प्रमुख घटक दल होते नितीश आणि नायडू यांची बार्गेनिंग पॉवर कमी करायची होती म्हणून गूज्जुभाई ने हात वर करून दिल्याचे नाटक केले होते.
नितीश आणि नायडू यांचे मस्तक ठिकाणावर केवळ दोन तासांत आणणे हे पहिले काम तर यशस्वी झाले मग अमित शहा यांनी दुसरा बॉम्ब टाकला की CCS म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरीटी ही पूर्ण भाजपची असेल म्हणजेच गृह,अर्थ,संरक्षण,व परराष्ट्र हे आमच्या कडे राहतील. मरता क्या न करता दोघांनीही ताबडतोब होकार दिला. त्यानंतर रात्री साडेसात वाजता नरेंद्र मोदी भाजप कार्यालयात आले आणि त्यांनी सरकार आम्ही स्थापन करू असे सांगून आमचा कार्यक्रम आम्ही राबवूच असे जाहीर केले. मोदींचे भाषण किती आत्मविश्वास पूर्ण होते हे तुम्ही आठवा.
असा सगळा वेगवान राजनैतिक घटनाक्रम पडद्याआड झाल्याने नितीश कुमार वारंवार NDA च्या बैठकीत म्हणाले की सरकार लवकर स्थापन करा आणि ९ जून ऐवजी ८जूनला शपथ घ्या आणि आमचे टेन्शन दूर करा बाबा.
इकडे ५ जूनला व ६जूनला सुद्धा लखनऊ आणि बंगलोर येथे लोकांचे बँकेत तसेच काँग्रेस कार्यालयात पैसे घ्यायला येणे चालूच होते. भाजप ने मस्त हवा भरली होती की जाओ पैसे मिल रहे हैं.
त्यामुळे संध्याकाळी जी इंडी गठबंधनची जी बैठक होती त्यात असा निर्णय झाला की आपण काही फोडा फोडी करू नये नाहीतर आपल्याला लोकक्षोभाला सामोरे जावे लागेल आणि नाचक्की होईल व परत काही जनता आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. राहुल गांधींची खटाखट ८५००/रू वाली घोषणा अशी अंगाशी आली.
त्यामुळे खडगे यांनी पत्र परिषदेत आम्ही योग्य वेळ येताच भाजप सरकारला हरवू असे म्हणून आम्ही काही सरकार स्थापन करणार नाही असे सांगितले.
याला म्हणतात चाणक्य नीती एका दगडात इंडी गठबंधन वाले व हे एनडीएतील अस्तनितील नितीश व नायडू दोन पक्षी दोघांना पण गुज्जूभाई ने ठेचले. आज दिनांक १० जूनला जे मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झाले आहे त्यावरून संपूर्ण स्थितीवर मोदी शहा यांचे नियंत्रण आहे हेच सिद्ध होते आहे.
ही अटल व अडवाणी यांची भाजप नाही हे लक्षात घेतले तर आपल्याला सुद्धा याचे आश्चर्य वाटणार नाही.
Offensive Defencee म्हणतात तो हाच आहे.
मोदी is in action with full force.
देवदत्त
संतोष माहूरकर
आपल्या प्रतिक्रिया द्या....