आरमोरी:-
दिनांक 31 मे 2023 रोज बुधवार ला ग्रामपंचायत कार्यालय वघाळा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व दीपप्रज्वलन करून साजरी करण्यात आली.
त्या प्रित्यर्थ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार आपल्या क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना देऊन सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ व रोख रुपये पाचशे देऊन गौरवण्यात आले व त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आले.
त्यात सौ. प्रणाली मनोज बनकर व सौ. प्रणाली सचिन भोयर यांना ग्रामपंचायतीचे सरपंच श्री मिथुन प्रधान यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
सौ.प्रणाली ताई मनोज बनकर या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान यात काम करीत आहेत तसेच त्यांनी लिंग समभाव, शिवण क्लास प्रशिक्षण, बचत गटाची बैठका, स्वच्छता अभियान, साक्षरता, गरोदर मातांना आहाराचे महत्वसांगणे, सावित्रीबाई फुले जयंती साजरी करणे, घरघर तिरंगा रॅली काढणे, बचत गटाचे महत्त्व पटवून देणे, बीपी शुगर तपासणी आरोग्य कॅम्प घेणे, जीवन ज्योती विमा काढण्याबद्दल माहिती देणे, तसेच मिशन अंतोदय सर्वे करणे या सर्वांमध्ये एक महत्त्वाची भूमिका त्यांनी केलेली आहे. सौ. प्रणाली सचिन भोयर या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळवून देणे त्याचा पाठपुरावा करणे, कोरोना जनजागृती करणे , covid-19 च्या संरक्षणासाठी भिंती फलक तयार करणे, covid-19 लसीकरणाचे सर्वे करणे, बँकेच्या मदतीने आर्थिक साक्षर कार्यक्रम घेणे, बँक मेळावा व पंचायत राज यामध्ये सहभाग, आजादी का अमृत महोत्सव यामध्ये सहभा व हिरकणी पुरस्कार प्राप्त इत्यादी कार्यात यांची अग्रणीय भूमिका आहे.
याप्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच श्री मिथुन प्रधान, ग्रामपंचायत सदस्य चेतन भोयर, अशोक माकडे, दुर्गाताई बांते, श्रीरामे ताई, लक्ष्मी धोटे, आशा वर्कर योगिता भरणे, अश्विनीताई दोनाडकर, जयश्री प्रधान, अंगणवाडी सेविका मनिषा ताई बुल्ले, ग्रामपंचायत शिपाई विलास प्रधान,गोलू भोयर व कम्प्युटर ऑपरेटर लोकेशन इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सचिव रिठे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....