अकोला:- -- अमरावती जिल्ह्यातील एक दबंग समाजशील युवा व्यक्तिमत्व,सामाजिक उपक्रमांमधून अमरावती जिल्ह्यात तरूण कार्यकर्त्यांची फौज निर्माण करणारे कृतिशील युवा नेते श्री निखिल उर्फ भैय्यासाहेब देशमुख (शिवरकर)यांची राष्ट्रवादी (शरद पवार) कॉंग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात त्यांच्या गत काळातील झंझावती कार्याचा आणि व संघटन चातुर्याचा आढावा घेऊन पक्षाने त्यांच्या नेर्तृत्वावर व्यक्त केलेला हा विश्वास आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची सरचिटणीस पदावर नियुक्ती केल्याची घोषणा केली.
श्री निखिल देशमुख हे एस टी महामंडळातील निवृत्त व लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे विदर्भ विभागीय संघटन व संपर्क प्रमुख पत्रकार श्री रावसाहेब उर्फ पि.एन.देशमुख (शिवरकर) यांचे चिरंजीव आहेत.मुंबई येथे नुकत्याच झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली असून या नियुक्तीबद्दल त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंद व्यक्त केला.अमरावती शहराला पक्षाने दिलेल्या या बहूमानाबध्दल त्यांच्या व ईतर पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.