कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): अखंड हिदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या श्री. शिवराज्याभिषेक सोहळा आणि विश्व हिंदू परिषद षष्ठीपूर्ती (साठ वर्षानिमित्त) सोमवार दि. 09 ऑक्टोबर 2023 रोजी सकळी ठिक 07:00 ते 10:00 वाजेपर्यंत,शौर्याच्या धगधगत्या सूर्याला आणि भगव्या वादळाला मानाचा मुजरा करण्याकरीता, स्थानिक झाशी राणी चौक ते जाणता राजा चौक-मोठे श्रीराम मंदिर-दत्त मंदिर मार्गाने श्री गुरु मंदिर पर्यंत,भव्य शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आलेले असून,श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या सन्मानार्थ समस्त हिंदु बांधवानी स्वेच्छेने आपआपल्या टू व्हिलर (मोटर सायकल) वाहनाने किंवा स्वतःचे फोर व्हिलर वाहन घेऊन शौर्य जागरण यात्रेत,छत्रपती शिवाजी महाराजांवरील श्रद्धा व भक्तीने आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन स्थानिक विश्व हिंदू परिषद,बजरंग दल आणि अखंड हिंद समाज कारंजाच्या वतीने करण्यात आले आहे. शौर्य जागरण यात्रा श्री गुरुमंदिर कारंजा येथे पोहोचल्या नंतर ठिक 10:00 वाजता भव्य शौर्य जागरण सभा होणार आहे. तरी ह्या सुवर्ण क्षणाचे साक्षिदार होण्याचा लाभ घेण्याचे आवाहन सुद्धा आयोजकांकडून करण्यात आले आहे .