आई एकविरा मंदिराच्या सुसज्ज सभागृह आणि वॉलकंपाऊडला निधी उपलब्ध करून देण्याची आ . पाटणी यांची व्यासपिठावरून घोषणा ! कारंजा : श्री एकविरा माता संस्थानच्या भव्य प्रांगणात, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा आणि संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या विद्यमाने भव्य असा "वारकरी मेळावा" घेण्यात आला . प्रारंभी " महाराणा प्रताप चौक - श्री कामाक्षा देवी मंदिर - गुरुमंदिर - एकवित देवी मंदिर पर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली . दिंडीचे आकर्षण म्हणजे दिंडीमध्ये अभिनेत्री आसावरी तिडके, अभिनेते नरेश गडेकर, स्वतः आ . राजेंद्र पाटणी, आ. ऍड किरणराव सरनाईक, उज्वल देशमुख, स्वागताध्यक्ष जयकिसन राठोड पायी चालत होते. तसेच लोहारा - वडगाव इ . येथील बंजारा महिलांची पेहरावात भजनी मंडळे सहभागी होते .मेळाव्याचे अध्यक्षस्थानी हभप श्रीकृष्ण महाराज राऊत हे होते तर उदघाटक म्हणून कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ. राजेंद्र पाटणी विशेष पाहुणे "संत गजानन शेगावीचे" या सन मराठी वरील दूर चित्र वाहिनीच्या अभिनेत्री, स्व स्मिता पाटील पुरस्कार प्राप्त अभिनेत्री आसावरी तिडके (गडेकर), अभा नाट्य परिषदेचे अध्यक्ष नरेश गडेकर होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये माजी नगराध्यक्षा उर्मिला ताई इंगोले, सौ आशाताई गाडगे, स्वागताध्यक्ष जयकिसन राठोड, नारायणराव काळबांडे, भुजंगराव वाळके, राजेंद्र मोडक, अ भा नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य उज्वल देशमुख, सौ सुधाताई चवरे,आयोजक संजय कडोळे होते. दिपप्रज्वलन, महापुरुषांचे पूजन, जिजाऊ वंदना, करंजमहात्म्यच्या एकविरा माता कॅलेंडरचे प्रकाशनाने कार्यक्रम प्रारंभ झाला.

मान्यवराच्या स्वागतानंतर, अभिनेत्री आसावरी तिडके यांना अभिनय सम्राज्ञी, नरेश गडेकर यांना अभिनय सम्राट, पंकजपाल महाराज, उज्वल देशमुख, सत्यपाल महाराज यांना, प्रदिप देशमुख, प्रदिप वानखडे, नंदकिशोर कव्हळकर , पत्रकार विश्वनाथ राऊत, किरण क्षार, एकनाथ पवार, सुनिल फुलारी, विजय खंडार,सुधाकर चौधरी, अरुण राऊत, निलेश सोमाणी,जिनवर तायडे , आरिफ पोपटे , मोहम्मद मुन्निवाले,दामोदर जोंधळेकर, विनोद गणविर, इम्तियाज लुलानिया, तारासिंग राठोड,आय के परमार, रोमिल लाठिया, सुनिल गुंठेवार, अरुण घोडसाड,डॉ ज्ञानेश्वर गरड,धनराज महाराज जाधव, किशोर धाकतोड, ऍड संदेश जिंतुरकर, ऍड दिंगबर पिंजरकर, डॉ मुजफ्फर खान,किर्तनकार हभप. कु . चित्राताई वाकोडे,मोनाली गणविर, सुनिता मेहसरे, छाया गावंडे, प्रणिता दसरे, यांना संत नामदेव तुकाराम सेवाव्रती वारकरी पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमात अभिनेत्री आसावरी गडेकर यांनी संत गजानन शेगावीचे मालिकेतील संवाद म्हणून दाखविताच प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला .

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना, आ राजेंद्र पाटणी, आ. किरणराव सरनाईक, आ. अमित झनक यांचे प्रतिनिधी कृष्णराव देशमुख यांचेकडे, संजय कडोळे यांनी, " वाढत्या महागाईला अनुसरून येत्या हिवाळी अधिवेशनात, वृद्ध साहित्यीक योजनेचे मानधन सांस्कृतिक विभागाकडून वाढवून पाच हजार रुपये करण्या बाबत आपण लक्षवेधी सूचना मांडून प्रस्ताव पारित करण्याची मागणी केली.

" यावर उत्तर देतांना, आ . राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना देवेन्द्र फडणविस यांचेशी समोरा समोर चर्चा करून मानधन वाढवून घेणार असल्याचे स्पष्ट केले. शिवाय बंटीभाऊ उर्फ सत्यजित गाडगे, आशाताई गाडगे, उर्मिलाताई इंगोले यांच्या मागणी वरून, आई एकविरा देवी संस्थानला सुसज्ज अशा सोईंनी युक्त भव्य असे सभागृह, वॉल कंपाऊड करणार असल्याचे जाहीर केली, आ. एड किरणराव सरनाईक यांनी सुद्धा विधान परिषदेत कलावंत योजनेच्या मानधना बाबत सांस्कृतिक मंत्रालयाच्या बैठकीत लक्ष्यवेधी मांडण्याचे अभिवचन दिले. कार्यक्रमात भावनाविवश होऊन हभप लोमेश महाराज चौधरी यांनी दिव्यांग व बेघर असलेल्या संजय कडोळे यांना घरकुल उपलब्ध करून देण्याची आ राजेंद्र पाटणी यांचेकडे मागणी केली यावेळी चौधरी अक्षरशः भावनाविवश झाले होते .

हभप .श्रीकृष्ण महाराज राऊत यांनी अध्यक्षिय भाषणातून, कार्यक्रमाचे आयोजक संजय कडोळे यांच्या निःस्वार्थ कार्याचे कौतूक करीत हा आमचा सुदामा असून आपण सर्व याच्या पाठीशी राहीले पाहीजे असे सांगत संजय कडोळे यांची संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या सांस्कृतिक विभागाचे कारंजा तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती जाहिर करीत पत्र दिले . कार्यक्रमाचे आयोजन संजय कडोळे यांनी,संचलन प्रणिता दसरे यांनी आभार प्रदर्शन नंदकिशोर कव्हळकर यांनी केले . कार्यक्रमाला आर्थिक सहाय्य डॉ इम्तियाज लुलानिया, नंदकिशोर कव्हळकर व मित्रमंडळी यांनी दिले. दुसऱ्या सत्रात हभप कु चित्राताई महाराज वाकोडे यांचे किर्तन व वारकरी मंडळी करीता महाप्रसाद करण्यात आला यावेळी पंचक्रोशीतील हजारो भाविक मंडळीनी महाप्रसादाचा लाभ घेतला .
आपल्या प्रतिक्रिया द्या....