अकोला:-
महाराष्ट्र सरकारचीह गाळ मुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार ही योजना लोकचळवळ करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने आणि सुहाना मसाले यांचे सहकार्याने अकोला जिल्ह्यात एक प्रचार रथ फिरविण्यात येणार आहे.
या प्रचार रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे हस्ते आज दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
यावेळी जिल्हा जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल मस्कर, भारतीय जैन संघटनेचे या प्रकल्पाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष गादिया, समीप इंदाने, नरेश चौधरी, बीजेएसच्या महिला जिल्हाध्यक्ष ममता जैन, बीजेएसचे महानगर अध्यक्ष विमल जैन, माजी नगरसेविका उषा विरक, रवी जैन, रमेश तोरावत, राजेश सोनी, संजय महाजन, सचिन पारेख, मंजू जैन , चैताली साखरे,माधुरी बोडखे,गीता बाली उनवणे,तुषार हांडे, जलसंधारण विभागाचे चंद्रशेखर खंडेराव, संजय कुंभरे, शुभम गाडगे बीजेएसचे जिल्हा समन्वयक विष्णू गव्हाळे प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेली गाळ मुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना तळागाळापर्यंत नेण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारानुसार शासनाची ही योजना प्रत्येक गावापर्यंत नेवून धरण आणि बंधाऱ्यातील गाळ काढणे, नाल्यांचे खोलीकरण आणि रूंदीकरण करण्यासाठी मागणी निर्माण करण्याचे कार्य भारतीय जैन संघटना करीत आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून प्रचार रथाचा आज शुभारंभ करण्यात आला आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....