वाशिम : केन्द्रशासन तथा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची अंमल बजावणी करणाऱ्या,राज्यातील अग्रणी असलेल्या एकमेव अशा मदत सामाजिक संस्था नागपूर, यांच्या तमाम महाराष्ट्रातील पुरस्कारार्थींच्या नावाची घोषणा कार्यकारी अध्यक्ष नरेश खडसे तथा संस्थेचे संस्थापक असलेले सचिव दिनेशबाबू वाघमारे नागपूर यांनी केलेली असून,त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातून सात पुरस्कारार्थीची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे कर्तव्याकरिता स्वतःच्या जीवावर उदार होऊन पत्रकारितेमधून सेवा करणारे साप्ताहिक नाथांजलीचे संपादक तथा वैदर्भिय नाथ समाज संघाचे संस्थापकिय अध्यक्ष एकनाथ पवार यांची छत्रपती शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार ; स्थानिक श्रीराम व्यायाम मंडळाचे अध्यक्ष तथा दैनिक मातृभूमिचे शहर प्रतिनिधी अमोल शालिग्राम अघम यांची, छत्रपती शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार ; रुईगोस्ता (ता.मानोरा) येथील महाराष्ट्रामध्ये चिरपरिचित हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांची छत्रपती शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार ; गोंधळी लोककलावंत गोपाल नारायण मुदगल यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ;सुप्रसिद्ध साहित्यीका सामाजिक कार्यकर्त्या अँड सौ. मंगलाताई माणिकराव नागरे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ; स्त्री शक्ती मंचच्या राज्यस्तरिय अध्यक्षा सौ. शारदाताई अतुल भुयार यांची क्रांतिबा-क्रांतिज्योती सावित्रीबाई नारीरत्न पुरस्कार ; आपल्या संपूर्ण हयातीत दुर्धर आजारग्रस्त रुग्नसेवेत तनमनधनाने सदैव कार्यरत राहणाऱ्या निष्काम सेवाधारी सौ.कृपाताई ठाकरे यांची संत गाडगेबाबा स्वच्छतादूत पुरस्कारा करीता निवड करण्यात आलेली असून,येत्या रविवारी दि 05 नोहेंबर 2023 रोजी मदत सामाजिक संस्था नागपूरच्या श्री गुरुदेव सेवाश्रम सभागृह नागपूर येथे उद्घाटक महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले,कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीष पांडव,प्रमुख पाहुणे नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी,अमरावती विधानपरिषद शिक्षक मतदार संघाचे आमदार अँड. किरणराव सरनाईक, झी मराठी वाहिनीवरील "तू चाल पुढे . . ."मालिकेचे अभिनेते देवेन्द्र दोडके, अनिल नगरारे,मा.प्राचार्य डॉ.के.बी.देशमुख, उद्योजक रमेश लोखंडे, संविधान संरक्षण समितीच्या अध्यक्षा अँड नंदाताई पराते,माजी नगरसेवक मनोज गावंडे, मनोज साबळे, सुभाष भोयर, श्री गुरुदेव सेवा मंडळ नागपूरचे अँड अशोक यावले, महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित असलेले विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे,एकता सेवाभावी संस्था परभणीचे अजमद खान, कृष्णा गोटाफोडे यांचे उपस्थितीत होणाऱ्या भव्य अशा सामाजिक कार्यकर्ता संमेलन तथा पुरस्कार वितरण समारंभात मदत सामाजिक संस्था नागपूर कडून, सर्व पुरस्कारार्थीना,आकर्षक असे सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,पुष्पगुच्छ व देशाचे संविधान देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.