कारंजा : कारंजा येथून जवळच असलेल्या इंझा [वनश्री ] येथील वैराग्यमुर्ती योगीराज सदगुरू संत श्री कैलासबाबा संस्थान येथे शनिवार दि १५ आँक्टोबर रोजी भाविक भक्त जनांचा मेळावा संपन्न झाला . यावेळी श्री दत्तजयंती निमित्त दि ६ डिसेंबर रोजी इंझा वनश्री येथे श्री गुरुचरित्राचे पारायण,किर्तन आणि दुसरे दिवशी इंझा [वनश्री] या गावामधून शेकडो भजनी मंडळाचे उपस्थितीत भव्य रथयात्रा, काल्याचे किर्तन व महाप्रसाद होणार असल्याची माहिती देण्यात आली असून दिपावली नंतर स्वतः सदगुरू संत कैलासबाबा हे श्री दत्तपोर्णिमा उत्सवा निमित्त आपले अनुयायी भाविक भक्त मंडळींकडे भ्रमंती करणार आहेत .
तरी पंचक्रोशितील संत कैलास बाबाचे भाविक भक्त मंडळींनी महाप्रसादाकरीता तन मन धनाने जास्तित जास्त सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच यात्रोत्सवा निमित्त लघु व्यावसायिकांनी आपआपली दुकाने आणावीत त्याच प्रमाणे रथयात्रेत जास्तित जास्त भजनी मंडळ, भजनी दिंड्यानी अगोदरच संत कैलास बाबांचे सेवाधारी हभप पद्माकर महाराज यांच्या मो नं 9922519543 किंवा 8550935451 वर सहभाग नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे.
शनिवारी संपन्न झालेल्या या भाविक भक्त मेळ्याला स्थानिक नागरिकांसह सरपंच संकेत नाखले, वारकरी मंडळाचे अध्यक्ष
संजय महाराज कडोळे ,दामोदर जोंधळेकर [पत्रकार], उमेश अनासाने कारंजा,अशोक चक्रे गोळेगाव , योगीराज चव्हाण पिंपळगाव
(काळे),प्रताप ठाकरे गोळेगाव ,
ज्योतीराम राठोड , दिनेश मनवर पिंपळगाव ,अरुण वानखडे आजणी (खाकी), किसनराव जाधव ( विहाळी),भीमराव जाधव (अजनी ), अमर पाटील शहा ,अनिल कोकाटे कारंजा ,दुर्गेश शेगोकर कारंजा ,आदित्य लिखे कारंजा ,कृष्ण रामदास इंगळे ,शेषेराव झिमटे उंबर्डा बा.,
मुकुंदराव पाढेन,गंगुबाई पेचकाडे, कारंजा आणि संत कैलासबाबांच्या शेकडो अनुदायी
भक्तजनांची उपस्थिती होती असे वृत्त पत्रकार दामोधर जोंधळकर यांनी कळवीले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....