बोरगांव मंजू - येथील प्रतिष्ठीत तथा पत्रकार संजय देऊळकर यांनी दि. 6 मे 2024 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी केली आहे.
दिलेल्या तक्रारीमध्ये नमुद केले आहे की, गैरअर्जदार शे. रहीम शे. करीम यांनी बळजबरीने माझ्या भिंतीला टिनशेड उभारुन तसेच खुल्या येण्या-जाण्याच्या जागेमध्ये विटा, गिट्टी व भंगाराचे साहित्य टाकून घराच्या बांधकामाला मोठा अडथळा निर्माण केला आहे. त्याला हटकले असता हातपाय तोडण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे पत्रकार संजय देऊळकर यांचा परिवार भयभीत झाला असून स्वत:च्या घरात राहणे कठीण झाले आहे. ग्रा.पं. बोरगांव मंजू सचिव यांच्याकडे गैरअर्जदार शे. रहिम शे. करीम यांनी केलेले बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्याबाबत तीन वेळा विनंती अर्ज दिले परंतु ग्रा.पं. बोरगांव मंजू सचिवाने कोणतीही दखल घेतली नाही व गैरअर्जदाराचे अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे गैरअर्जदार शे. रहीम शे. करीम यांचे मनोबल वाढले असून जागा हडपण्याच्या तयारीमध्ये आहे. गैरअर्जदार विशिष्ट जातीचा असून त्याचा मोठा जोडजमाव या ठिकाणी आहे. तो माझा व माझ्या परिवारावर जाती द्वेषातून माझ्यावर कधीही हमला करु शकतो हे नाकारता येत नाही करिता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी तक्रारीत केली.