वरोरा :- जवळपास 4000 लोकसंख्या असणाऱ्या चिकणी या गावातील ग्रामपंचायत मध्ये मागील दोन वर्षापासून शिपाई पद रिक्त असल्याने ग्रामपंचायत नेहमी चालू बंद असते. त्यामुळे येथील नागरिकांना आपल्या अनेक कामासाठी नेहमी त्रासाला समोर जावे लागत आहे. त्यामूळे हे रिक्त पद भरणार की नाही याबाबत गावातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
तालुक्यातील चिकणी ग्रामपंचायत मध्ये अनेक कामासाठी नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.
शिपाई पद रिक्त असल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहे. येथील शिपाई पदी कोणीही नसल्याने या ग्रामपंचायतीची दुरावस्था आली आहे. मागील दोन वर्षापूर्वी शिपाई या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यात रोजंदारी करणाऱ्या व्यक्तीला 100 पैकी 100 गुण प्राप्त झाल्याने नागरिक, विद्यार्थ्याने आक्षेप घेतला त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.ती परीक्षा पंचायत समितीच्या सभागृहात सवर्ग विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात येईल असे ग्रामविकास अधिकाऱ्याने घोषणा केली होती. मात्र ही घोषणा हवेत उडून गेली व त्या जागी आता अनाधिकृत पणे हंसराज हेमकांत ताजने पाणीपुरवठा सेवक काम करीत आहे. शासकीय कागद पत्रावर सही सिक्के मारन्याचे कामही करतो. याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता आम्ही कोणत्याही कर्मचारी सेवकाला काम सांगण्याचे अधिकार असल्याचे ग्रामविकास अधिकाऱ्याने सांगितले मात्र या कामात कोणतीही मोठी चूक झाल्यास याच जबाबदार कोण असे विचारले असता यावर कोणतेही उत्तर देण्यास नकार दिला, चिकणी ग्रामपंचायतचे सरपंच नामदेव ढेंगळे यांना विचारले असता मी वारंवार ग्रामविकास अधिकाऱ्याला शिपाई हे पद त्वरित का भरण्यात येत नाही, याबाबत कोणती अडचण निर्माण झाली आहे हे विचारले असता शिपाई पद भरत नसल्याचे दिसून येते. एकंदरीत या ग्रामपंचायतीमधील या भोंगळ कारभाराने ग्रामविकास अधिकाऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून न्याय मागण्यासाठी जावे कुणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वर्षांपूर्वी रद्द करण्यात आलेली परीक्षा आता केव्हा होणार यासाठी गावातील विद्यार्थी प्रतीक्षेत असून आपणास रोजगार मिळणार किंवा नाही असे प्रश्न विचारू लागलेले आहे. तर या पदासाठी ग्रामविकास अधिकाऱ्याने पाणी पुरवठा सेवकाकडून एक ते दीड लाख रुपये घेतल्याचेही नागरिकांचे म्हणणे असल्याने शिपाई पदाची नेमणूक होणारकी नाही? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
बॉक्स चिकणी ग्रामपंचातीतर्फे 30मार्च 2021ला शिपाई पदाची जाहिरात काढण्यात आली, तर दि 15जून23 रोजी शिपाई पदाची घेतलेली परीक्षा रद्द करण्यात आली, मग 29डिसेंबर 23ला मासिकं सभेत कार्लेकर यांच्या रिक्त पदी नविन शिपाई भरती करण्यात यावी यासाठी गटविकास अधिकारी वरोरा यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात यावे असा ठराव कसा घेण्यात आला? मग 30मार्च रोजी घेण्यात आलेली परीक्षा कुणाच्या आदेशानुसार घेण्यात आली? त्यामुळे या सर्व प्रकारात ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचे दिसुन येत आहे.