नागभीड :- एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याच्या नादात शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी नागभीड तालुक्यांतील मौशी ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच व एक ग्रा.पं. सदस्य अशा तिघांचे सदस्यत्व रद्द केल्याने पद गमवावे लागले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असुन ग्रामविकासाकडे मात्र दुर्लक्ष होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत .
नागभीड तालुक्यांतील मौशी हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. १५ जानेवारी २०२१ ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कॅांग्रेसप्रणित गटाचे ५ तर भाजपप्रणित ४ ग्रा.पं. सदस्य निर्वाचित झालेत . त्यातुन कॅांग्रेसच्या सौ. संगिता प्रमोद करकाडे या सरपंच पदी तर दिगांबर शिवराम लोखंडे उपसरपंचपदी विराजमान झालेत . या निर्वाचित पदाधिकाऱ्यांकडुन गावविकासासाठी प्रयत्न होतील असे वाटत असतांनाच राजकीय वैमनस्यातुन सरपंच व उपसरपंच यांनी भाजपा गटातील ग्रा.पं. सदस्य अरविंद भुते यांचा दुसऱ्या तालुक्यात असलेल्या शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुढे आणला . मौशी येथीलच त्रिलोक माधव बगमारे या कार्यकर्त्याच्या नावाने जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्याकडे अरविंद भुते यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी तक्रार दाखल केली