आरमोरी :-
दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोज बुधवारला मराठी विज्ञान परिषद शाखा आरमोरी व वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व डॉ. सी व्ही. रमन यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली .
प्राचार्य नितीनजी कासार सरांनी अध्यात्माशिवाय विज्ञानाची प्रगती अधूरी आहे याविषयीचे मत व्यक्त केले .
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले प्राचार्य डॉ.आशिष सेलोकर सरांनी विद्यार्थ्यांना समस्यांचे मूळ शोधून कार्य केल्यास आपण सुद्धा संशोधक होऊ शकतो या विषयी छोटे छोटे उदाहरण देऊन व चांद्रयान माहिमेत इस्त्रो या संघटनेने किती योगदान आहे या विषयीचे सखोल मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून मार्गदर्शन करतांना मा. डॉ. के . टी. किरणापूरे सरांनी विद्यार्थ्यांनी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे कसे आवश्यक या विषयी मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमात परिषदेच तर्फे आयोजित करण्यात आलेल्या
निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक ( वर्ग 8 ते 12 ) मधून कुमारी श्रावणी हरेश बावनकर हितकारणी विद्यालय आरमोरी .
द्वितीय क्रमांक- कुमारी सिमरण हरिश्चंद्र वाटगुरे महात्मा गांधी कन्या विद्यालय आरमोरी
तृतिय क्रमांक - कुमारी पायल विनोद बेहरे पॅराडाईज इंग्लीश मिडीयम स्कूल आरमोरी
निबंध स्पर्धा खुला गट
प्रथम क्रमांक - कुमारी गायत्री . राजू बेहरे महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय आरमोरी
द्वितीय क्रमांक - सुजाता एन अवचट पॅराडाईज इंग्लीश मिडीयम स्कूल आरमोरी
गणितीय मॉडेल स्पर्धा
प्रथम क्रमांक - कूमारी के. डी. राऊत वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर आरमोरी
द्वितीय क्रमांक - कुमारी एम . ए. तुंगीडवार वत्सलाबाईं वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर आरमोरी
तृतीय क्रमांक - कुमारी जी . डी. राऊत वत्सलाबाई वनमाळी स्कूल ऑफ स्कॉलर आरमोरी
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलनाज शेख , प्रास्ताविक हरेश बावणकर व
आभार प्रदर्शन ज्ञानेश्वरी शेंडे
यांनी केले .
या कार्यक्रमाला मराठी विज्ञान परिषदचे सदस्य व वत्सलाबाई स्कूल ऑफ स्कॉलर चे कर्मचारी यांनी सहकार्य केले .
आपल्या प्रतिक्रिया द्या....