अकोला: स्थानिक टोटल वेलनेस क्लब ,रामदास पेठ अकोला येथे पावर लिफ्टिंग चे धडे गिरविणारे अनिश किशोर देशमुख व निखील कैलाश चव्हाण या खेळाडूंनी नागपूर येथे दिनांक 06 व 07 एप्रिल 2022 रोजी संपन्न झालेल्या नॅशनल पॉवर लिफ्टींग + बेंच प्रेस चॅम्पियन्स आणि वर्ल्ड ट्रेल्स (रॉ) 2022 या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. अनिश किशोर देशमुख याने सब जूनियर 74 ते 83 वजन गटात सिल्वर मेडल पटकावले तर निखिल चव्हाण याने जूनियर वर्गवारी मधून 83 किलो गटात ब्राँझ मेडल पटकावले. या दोन्ही खेळाडूंनी पावर लिफ्टिंग चे धडे प्रशिक्षक श्री दिनेश यादव व श्री विशाल पेटकर यांच्या मार्गदर्शनात घेतले. अनिश हा डॉक्टर किशोर निळकंठराव देशमुख( संगीत विभाग प्रमुख श्री शिवाजी महाविद्यालय अकोला व संचालक विदर्भ संगीत अकॅडमी) यांचा मुलगा असून गेल्या सहा महिन्यात चार स्पर्धेत भाग घेऊन त्याने सर्व स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने यश संपादन केले आहे. अनिश देशमुख याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली असून पोलंड येथे होणाऱ्या स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. हे दोन्ही क्रिडापटू दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य असून समाज कार्यात सक्रिय आहेत .अनिश देशमुख हा गावंडे कॉलेज ऑफ फार्मसी साखरखेडा या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला संगीताची आवड असून उत्तम तबला वादक व गायक म्हणून तो विविध कार्यक्रमात आपली कला सादर करत असतो. त्याच्या या घवघवीत यशाकरिता अकोलेकर व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे कौतुक केले असून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या आहेत.