अकोला_महाराष्ट्र शासनाचा साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार नुकताच डॉ रामकृष्ण डोंगरे यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे भारतीय जनता पक्ष अनुसूचित आघाडीचे सरचिटणीस असून आरोग्य दायी उपक्रम फिरते व्यसनमुक्ती केंद्र समाजातील गरीब गरजू लोकांना मदत करण्याचा स्वभाव तसेच त्यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोप्रांत भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात अकोला जिल्ह्यामध्ये व इतर जिल्ह्यांमध्ये स्वाक्षरी अभियान राबवून शासनापर्यंत आवाज उठवला असल्याचे व त्यांचे सामाजिक कार्य पाहता महाराष्ट्र शासनाने त्यांचा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हा मानाचा पुरस्कार त्यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून बहाल केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे करावे तेवढे कौतुक कमीच असल्याचे गुड मॉर्निंग ग्रुप अकोला व जय हनुमान बहूउद्येशिय संस्था अकोल्याच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भाजप नेते तथा सचिव ओबीसी मोर्चा महाराष्ट्र डॉ अशोक ओळंबे यांनी असे उदगार त्यांचा सत्कार करताना काढले कार्यक्रमाला ज्येष्ठ सदस्य दिनकरराव घोडेराव अड संतोष गोळे अरुण मानकर प्रशांत बानोले सुरेंद्र शिरसाठ गजानन गोलाईत गजानन घोंगे राजाभाऊ देशमुख राजु मानकर गजानन लोंदे किशोर वडतकर अमोल हिंगणे गजानन मोरे यांचेसह गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य तथा जय हनुमान बहुउद्येशिय संस्थेचे सहसचिव अड संतोष गोळे यांची केंद्र शासनाने नोटरी म्हणुन नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला.