सन-2019-20 या सत्रातील भारत स्काऊट राज्य पुरस्काराकरिता वर्धा जिल्यातील निवड झालेल्या बोथली(की) शाळेतील अक्षय मनोहर डोळे याला शासकीय नियोजित कार्यक्रमात आज दि.26/4/022 रोज मंगळवारला मुंबई* येथे कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते व क्रीडा मंत्री सुनीलजी केदार यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यमंत्री आदिती तटकरे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत अक्षय डोळे* याला भारत स्काऊट राज्यपुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ऐतिहासिक यशाबद्दल प.स.आर्वीचे गटशिक्षणाधिकारी सुरेश पारडे,बिटविस्तार अधिकारी सतीश कास्टे, केंद्रप्रमुख अजय वनस्कर मार्गदर्शक शिक्षक मारोती विरुळकर,मुख्याद्यापक राजेंद्र गायकवाड,भानुदास आजणकर,किशोर खिराळे, रंजना बाबुळकर,स्मिता जवजवार,प्रमोद पिंजारे, सरपंच, व्यवस्थापन समिती व गावकरी यानी अभिनंदन केले.