कारंजा लाड -- शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे तर शेती शेतकऱ्यांचा पण अवेळी व कमी पडणारा पाऊस व त्यामुळे पिकांचे होत असलेले नुकसान , राज्य सरकार ची शेतकऱ्यांविषयी ची असलेली अनास्था , शेतकऱ्यांना बॅंकाकडुन कर्ज वाटप करण्यासाठी होत असलेली टाळाटाळ इ कारणांमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला असून त्यातच त्यावर कढी म्हणजे कारंजा लाड तालुक्यात यावर्षी ऑगस्ट व सप्टेंबर 2023 मध्ये पाऊसाचं प्रमाण कमी होतं त्याचा परिणाम म्हणून सोयाबीन, तूर , कापसी व अन्य पिकांची कमालीची घट झाली त्यातच सोयाबीन चे भाव सुध्दा गडगडले शेतकऱ्यांची अशी बिकट अवस्था असतांना खरिपाचा विम्याची रक्कम दिवाळी तोंडावर आली असतांना सुध्दा शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही जमा झाली नाही त्यामुळे विमा कंपनीवर गुन्हा दाखल करून त्वरीत पीक विमा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना शेती साठी दिवसा 10 तास सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी कारंजा लाड तालुका काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष व उंबर्डा बाजार चे सरपंच राज नरहरी चौधरी यांनी एका निवेदनात माध्यमातून माननीय तहसीलदार यांच्या मार्फत राज्य सरकार ला केली आहे.
पुढे निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि पीक विमा दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा कारंजा तालुका काँग्रेस कमेटी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही
निवेदन देते वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी चे सचिव दिलीपभाऊ भोजराज,वाशिम जिल्हा काँग्रेस कमेटी सहकार विभागाचे अध्यक्ष राजाभाऊ डोणगावकर,वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादल चे जिल्हा समन्वयक ॲड संदेश जैन जिंतुरकर, कारंजा लाड शहर काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष अमीर खान पठाण, उमेश शितोळे, कारंजा लाड शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष युसुफ भाई जट्टावाले,विमुक्त जाती व भटक्या जमाती चे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव अवताडे, दादाराव डोंगरदिवे, अदनान पठाण , आशु तायडे ,अमीन खान, जुनेद खांन उपस्थित होते