कारंजा : अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ निवडणूकीत विजयश्री प्राप्त केल्याबद्दल कलावंत-नंदकिशोर कव्हळकर,तसेच वाढदिवसानिमित्त कारंजा नगरीतील आघाडीचे गायक कलाकार तथा कारंजा नगर पालिका आरोग्य विभागाचे निरिक्षक मास्टर राहुल सावंत आणि उत्कृष्ट चित्रपट निर्माते डॉ इम्तियाज लुलानिया इत्यादींच्या वाढदिवसानिमित्त,त्यांचा स्थानिक इन्नानी जीन येथे आदर्श जय भारत सेवाभावी संस्था,विदर्भ लोककलावंत संघटना आणि ईरो फिल्म्स इंटरटेन्टमेन्ट या संस्थांकडून डॉ.ज्ञानेश्वर गरड यांच्या पुढाकारामधून भव्य अशा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी सर्वप्रथम सत्कारमुर्ती मास्टर राहुल सावंत यांचा संस्थेतर्फे शाल,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन डॉ गरड यांनी सत्कार केला. त्यानंतर गावातील विविध संस्था आणि मास्टर राहुल सावंत यांचे मित्रमंडळ व चाहत्यांनी देखील मास्टर राहुल सावंत यांचा सत्कार केला. त्यांचे शिवाय वाढदिवसानिमित्त चित्रपट निर्माता व वैद्यराज डॉ. इम्तियाज लुलानिया यांचा आणि नव्याने अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूकीतील विजयी वाशिमचे सदस्य उज्वल देशमुख तथा नंदकिशोर कव्हळकर यांचा सुध्दा शाल, पुष्पगुच्छ व संस्थेकडून भेटवस्तु देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला कारंजा नगर पालिकेचे अधिकारी विनय वानखडे , राधाताई मुरकुटे, रोमिल लाठीया, डॉ . कलिम मिर्झा, रविन्द्र नंदाने सर,अतुल धाकतोड , विजय राठोड, अँड संदेश जिंतुरकर, रामदास कांबळे, सौ अर्चना तोमर, उमेश अनासाने, दादाराव सोनिवाळ इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर गरड यांनी केले.यावेळी बोलतांना त्यांनी संस्था गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याचे सांगतांना संस्थेच्या वतीने सर्व धर्मीय विवाह सोहळा,रोग निदान शिबीरे, व्यसनमुक्ती कार्यक्रम, गोरगरिबाला कपड्याचे वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपन आदी कार्य ही संस्था प्राधान्याने करीत असल्याचे स्पष्ट केले.यावेळी आदर्श जय भारत संगीत परिवाराने गीतगायन सादर केले. डॉ इम्तियाज लुलानिया, राहुल सावंत, नंदकिशोर कव्हळकर, उज्वल देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोमिलशेठ लाठीया यांनी केले.