तालुक्यातील भगवानपूर जंगल परिसरात विविध ठिकाणी टाकलेला मोह सडवा, दारू व हातभट्ट्या असा एकूण १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल नष्ट केल्याची संयुक्त कृती गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या केली. पोलिस व मुक्तिपथ तालुका टीमने संयुक्तरीत्या भगवानपूर जंगल परिसरात शोधमोहीम राबवली असता, पोलिसांना बघताच दारू विक्रेत्यांनी पळ काढला. यावेळी विविध ठिकाणी मिळून आलेला २७ ड्रम मोहफुलाचा सडवा, ४० लिटर दारू व हातभट्टी नष्ट करण्यात आली. पोलिसांनी १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल नष्ट केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.