कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्रजी पाटणी यांनी शासन आपल्या दारी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी गरजूंनी जवळच्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन नागरिकांना केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी "शासन आपल्या दारी " हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राज्यात अत्यंत प्रभावीपणे सुरू केला असून याची अंमलबजावणी राज्यभर सुरू असून सरकार प्रशासन मार्फत गरजूला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना सेवेचा व अनेक योजनांचा लाभ देत असल्याचे दिसत आहे. तेव्हा ज्यांना योजनेतून लाभ मिळवायचा आहे किंवा सेवा प्राप्त करायची आहे त्यांनी सरकार आपल्या दारी या योजने नुसार प्रशासन आपल्या पर्यंत येत आहे त्यात आपला सहभाग द्या. किंवा जवळच्या संबंधित कार्यालयासी संपर्क साधून योजनांचा लाभ घ्या असे आवाहन कारंजा मानोरा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले आहे.शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना या योजनांचा लाभ सहजतेने मिळावा यासाठी राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री सचिवालयासह प्रत्येक जिल्ह्यात जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आले आहेत.या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी गरजूंनी जवळच्या संबंधित शासकीय कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,महाराष्ट्र शासन यांच्याकडून नागरिकांना कळले.
सरकारी योजना व सेवा नागरिकांच्या घराघरात पोहोचण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शासन आपल्या दारी उपक्रम सुरू केला आहे शासन आपल्या दारी या उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा आहे गरजू व्यक्तींना योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत होती अनेक कार्यालयाशी संपर्क साधावा लागत होता आणि त्यांचा हक्क असलेल्या योजनांमध्ये सहभाग घेण्यासाठी अनेक कार्यालयांना भेट घ्यावी लागत होती परंतु सरकार आपल्या दारी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार थेट लोकांच्या दारात पोहचले. योजनांचा लाभ गरजूंना मिळण्यासाठी ही प्रक्रिया सुलभ ठरत आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने हा उपक्रम सुरू केला असुन नागरिकांना सरकारी योजना आणि कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्राथमिक उद्देश असल्याचे या योजनेच्या अंमलबजावणीवरून लक्षात येते.