नागपूरच्या मानकापूर परिसरात भरधाव ट्रकने 12 गाड्यांना धडक दिली आहे. यामध्ये 9 कार, एक रुग्णवाहिका आणि दोन दुचाकी वाहनांचा समावेश आहे.
या अपघातात चारजण जखमी झाल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे. ट्रकने धडक दिल्यामुळे एक कार थेट दुसऱ्या कारवर चढल्याची घटना घडली आहे.
मानकापूर चौकात झालेल्या भीषण अपघातात 12 ते 13 चार चाकी गाड्यांचं नुकसान झालं आहे. उड्डाण पुलावरून येणाऱ्या भरधाव ट्रकने सिग्नलवर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांना जोरदार दिली धडक दिली. या धडकेत सुमारे पाच ते सहापेक्षा जास्त कारचं नुकसान झालं आहे. या अपघातानंतर घटनास्थळी बराचवेळ तणावाचं वातावरण होतं, अशी माहिती मिळतेय.
अपघातग्रस्त कारमधील प्रवाशांना जबर मार लागला आहे. अपघातग्रस्त प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. धडक एवढी जबरदस्त होती की, एक कार दुसऱ्या कारवर चढल्यामुळे कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी गर्दी झाली होती. वाहतुकीचाही बराच वेळा खोळंबा देखील झाला होता.
चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यामुळे तो समोर लाल सिग्नल असल्यामुळे थांबलेल्या वाहनांवर मागून धडकला. या कंटेनरनेअगोदर एका कारला धडक दिली. त्यानंतर काही कार अन् दुचाकी फरफटत गेल्या. यामध्ये एक दुचाकी कंटेनरखाली चिरडली गेली. या अपघातात रुग्णवाहिकेचाही चेंदामेंदा झाल्याचं समोर आलं आहे.
आतापर्यंत या अपघातात चारजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहेत. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तातडीने मानकापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत या घटनेत कुणाचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली नाही.