कारंजा : कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम तुळजापूर येथील,श्री.नामदेव महाराज संस्थान तुळजापूर (कारंजा) येथे दरवर्षी प्रमाणे धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले होते. असे वृत्त कारंजा येथील महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे गावकरी मंडळी कडून कळविण्यात आले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, या सोहळ्या निमित्त ग्राम तुळजापूरच्या प्रवेश मार्गावर भव्य असे प्रवेश द्वाराचे याप्रसंगी श्री संत नामदेव महाराज संस्थान विश्वस्त मंडळ, ग्राममंडळ संचालक तथा पदाधिकारी आणि बहुसंख्य गावकर्याचे उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. शिवाय यंदाही कार्तिक एकादशी निमित्त भजन,किर्तन, हरिपाठ व इतर कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर संत नामदेव महाराज पालखी नगरपरिक्रमा पार पडली.
पालखी मध्ये सुकळी,किन्ही,आखतवाडा, तुळजापूर येथील भजनी मंडळ, हरिपाठ मंडळ, लेझीम मंडळ यांचा सहभाग होता.तुळजापूर गावातून जेव्हा पालखी सोहळा निघाली तेंव्हा गावकऱ्यांनी रांगोळी काढून आणि फुलांचा वर्षाव करत पालखीचे स्वागत केले.पालखी सोहळ्याचा लहान मुलांपासून तर वयोवृद्धांनी आनंद लुटला.वरील सर्व कार्यक्रमात ग्राममंडळ प्रशासन व समस्त तुळजापूर गावकरी मंडळ यांचा मोठा सहभाग होता.वरील सर्व कार्यक्रमाची रामलाडूच्या स्वादिष्ट महाप्रसादाने सांगता झाली.रामलाडू या महाप्रसादाचा शेकडो भाविक भक्तांनी लाभ घेतला.असे वृत्त प्राप्त झाल्याचे आमचे अधिकृत प्रतिनिधी संजय कडोळे (मो.9075635338) यांनी कळवीले आहे.