जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये शहरीसह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला. शहरातील वसंत देसाई स्टेडियम येथे या स्पर्धा पार पडल्या. विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. दिवसभरात धावणे, उडी, फेक , जलतरण अशा विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा पार पडल्या.यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विजयी खेळाडूंना विभागीय स्तरावरील स्पर्धांकरिता संधी मिळणार आहे. या स्पर्धांमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
मास्टर पॉवर स्विमिंग क्लब चे संचालक मा. श्री. योगेश पाटील (NIS) , मंगेश चंदन बटवे, अभिजीत फिरके सर (SO), विशाल पोहेकर, दिपक सदांनशिव, निशांत वानखडे प्रमोद खंडारे, सतीश पांझाडे, सुशील कांबळे, दिनेश वाघ, प्रथमेश डोईफोडे, विक्की पवार, तुषार शेगोकार, कार्तिक दुबे, यांचे सहकार्य लाभत आहे