ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन चे दोन कर्मचारी शासकीय कामाकरीता चंद्रपूर ला जात असताना मुल – सिंदेवाही चीतेगाव फाट्याजवळ काल सकाळी १०.३० च्या
सुमारास अपघात झाला.त्या अपघातील जखमींना पोलिस कर्मचाऱ्यांनी अपघातातील गाडीतून बाहेर काढून आपल्या वाहनाने मुल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांची वेळेवर देवदू यासारखी मदत मिळाल्याने अपघातातील रुग्णास जीवदान मिळाले.त्याच्या या कार्यामुळे उपस्थित नागरिकांनी व अपघात ग्रस्त यांच्या नातेवाईकांनी त्या दोन्ही पोलिस कर्मच्यारांचे धन्यवाद मानले व त्यांचे आभार मानले.संदेश देवगडे व उमेश बोरकर असे ब्रम्हपुरी पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
सविस्तर वृत्त आज दिनांक २६ मे सकाळी१०-१५ वाजता सिंदेवाही- मुल चितेगाव फाट्यानजीक रोडवर मूल कडून सिंदेवाही कडे चारचाकी गाडीने जात असताना नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला आदळली त्यामुळे अपघातात एकजण गंभीर जखमी अवस्थेत पडून होता तर चालक सुखरूप अवस्थेत होता त्यांनी टोलफ्रि108 वर कॉल केला. मात्रअंबुलन्स येण्यासाठी वेळ लागणार होती ते दोघेही तसचे वेदनेने जखमी अवस्थेत पडून होते.अशातच अगदी त्याचवेळी ब्रम्हपुरी पोलिसांची गाडी चंद्रपूरला शासकीय कामा करीता जात असताना अपघात स्थळी थांबले व हकिकत समजून घेऊन क्षणाचा विलंब न करता जखमींना आपल्या पोलीस गाडीत टाकून मूल येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन पाहून घटनास्थळी जमलेल्या लोकांनी पोलिसांना धन्यवाद देऊन देवदूता समान प्रगटल्या बद्दल आभार मानून निरोप दिला. त्या पोलिसांची नाव संदेश देवगडे, चालक उमेश बोरकर पो .स्टे.ब्रम्हपुरी अशी आहे.यांच्या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.