पारशिवनी - आज दि.14/08/2022 रोज रविवारला स. ठिक 11.00 वाजता सरोजनी पब्लिक स्कूल, पारशिवनी येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत पारशिवनी शाखेची मासिक सभा व पारशिवनी तालुका प्रमुख श्री.मनोहरराव ढोले यांच्या 87 व्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार कार्यक्रम मा. संध्याताईजी पुनियानी मॕडम महिला अध्यक्षा नागपूर जिल्हा यांचे अध्यक्षतेखाली , मा.चंद्रपालजी चौकसे साहेब, पर्यटन मित्र तथा संस्थापक रामधाम मनसर प्रमुख पाहुणे यांचे हस्ते व मा. ज्ञानोबा गुणवंत पळनाटे साहेब सहायक पोलीस इन्स्पेक्टर पारशिवनी यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत पारशिवनी तालुक्याच्च्या वतीने श्री मनोहरजी ढोले तालुका प्रमुख यांचा 87 व्या वाढदिवसा निमित्त सत्कार सोहळ्यात श्री चंद्रपाल चौकसे साहेब सहभागी होऊन त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी बोलतांना म्हणाले कि आज ग्राहक जागृत होणे गरजेचे आहे, वस्तूची खरेदी निवड डोळसपणे करावी, फसवणूक झालेल्या ग्राहकांना पंचायतने न्याय मिळवून द्यावा. यावेळी संध्याताई पुनियानी अध्यक्ष यांनी महिलांनी अन्नाची भेसळ कशी ओळखावी, फसव्या जाहिरातीला बळी पडू नये असा बोलतांना सल्ला दिला. ज्ञानेश्वर पळनाटे सहायक पोलीस निरीक्षक पारशिवनी यांनी ग्राहक कायदे यावर प्रकाश टाकला. , ज्ञानेश्वर चौधरी राष्ट्रीय सदस्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. संचलन नरेश उराडे , तर आभार सिंधुताई चव्हाण यांनी केले.
कार्यक्रम सफल करण्यास विशेष सहकार्य लाभले यामध्ये ज्ञानेश्वर चौधरी राष्ट्रीय सदस्य, नरेश उराडे तालुका अध्यक्ष, श्याम खंडाळकर तालुका सचिव, विठ्ठलराव गांजरे संघटनमंत्री,रघुनाथ पुंडे तालुका उपाध्यक्ष, नरेंद्र नाकाडे कार्याध्यक्ष, विजय भरणे सहसचिव, भाऊराव कुरळकर संयुक्त चिटणीस, रेखा दुनेदार तालुका महिलाध्यक्षा, सिंधुताई चव्हाण तालुका महिला सचिव,राधिका बांगडकर महिला उपाध्यक्ष, गेमिना सोमकुवर महिला सहसचिव, राजेश देशमुख, अशोक वलोकर,प्रल्हाद अलोने,रामेश्वर दुनेदार, सुधाकर काळबांडे,दिलीप वाळके, परसराम राऊत, कन्हैयालाल सरोदे, कमलाकर भुते, कपिल मोटघरे, राजेश रंधई, धर्मदास लोहकरे, अशोक राऊत,निखिल फटींग,प्रभाकर बढे,किरण पहाडे,शुभदा उराडे, माधुरी तांदूळकर, प्राजक्ता गिरगुसे,आशा बगमारे, मंगला खंडारे, लिला कुंभरे, सरस्वतीबाई वानखेडे, निर्मला खरकाटे, छाया इळकर सदस्य उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....