ब्रम्हपुरी शिवसैनिकांचं प्रेरणास्थान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 97 वी जयंती निमित्य बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुका ब्रम्हपुरी च्या वतीने तालुक्यातील सोन्द्री येथील शिवसेना संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते व ब्रम्हपुरी उपतालुका प्रमुख केवलराम पारधी यांच्या हस्ते माल्यर्पन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते यांनी यावेळी हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर "मार्मिक" फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवत मराठी माणसाला न्याय्य मागण्यासाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला, असे मार्मिक विचार प्रसंगी व्यक्त केले. यावेळी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. प्रसंगी शिवसैनिकांच्या वतीने सोंद्री गावातील गावकर्यांना मिठाई चे वाटप करण्यात आले. यावेळी सुरेश दुनेदार सरपंच पिंपळगाव, संदीप आंबोने, प्रेमदास दाणे,गोपाल उरकुडे, अजय येलतुरे,रघुनाथ देशमुख व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.