मानोरा : राष्ट्रसंत गुरुदेव तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रभावीत होऊन,श्री. गुरुदेव सेवा मंडळाशी नाते जोडीत,वाशिम जिल्ह्याच्या, मानोरा तालुक्यातील,ग्राम जनुना (खुर्द) या छोट्याशा गावखेड्यातील लोमेश केशवराव चौधरी यांनी,गावातील समवयस्क मित्रमंडळीच्या माध्यमातून आपल्या गावात श्री गुरुदेव सेवा मंडळाची शाखा स्थापन केली. स्वत : लोमेश केशवराव चौधरी हे उत्कृष्ट हार्मोनिअम वादक, मृदंगाचार्य असल्याने भजन मंडळ तयार करून,गुरुदेवांच्या भजनाचा त्यांनी प्रचार प्रसार करून आयुष्यभर मानवसेवा या ब्रिदाने समाजाच्या व्यसनमुक्तीचे कार्य हाती घेऊन,आजता-गायत, गावोगावी जाऊन कितीतरी लोकांना व्यसनापासून परावृत्त करून,त्यांचे संसार जोडण्याचे कार्य केले व करीत आहेत. त्यामुळे आज पंचक्रोशीत त्यांना व्यसनमुक्ती सम्राट या उपाधीने ओळखले जाते.तरी शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाने, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देऊन गौरवांकित केले पाहीजे.अशी त्यांच्या चाहत्यांकडून मागणी होत आहे.