कारंजा (लाड) : सध्याचे शासन एकीकडे,धनदांडग्यांचे व प्रस्थापितांचे लालन पालन करीत त्यांना पाठीशी घालत आहे. तर दुसरीकडे तळागाळातील, गोरगरीब सच्च्या देशभक्त समाजसेवक व लोककलावंतावर हेतुपुरस्परणे अन्याय करीत आहे. याचे जीवंत उदाहरण म्हणजे "गेल्या पन्नास वर्षापासून,आपल्या सप्तखंजेरीच्या प्रबोधनातून समाजातील अंधश्रद्धा,जातीभेद, व्यसनमुक्ती,घनकचरा नियोजन, बेटी बचाओ बेटी पढाओ, हुंडाबळी,स्त्री भ्रूण हत्या निर्मूलन, निरक्षरता निर्मूलन,शिक्षणाचे महत्व, हागणदारी मुक्त गावखेडी, सेन्द्रीय शेती वापर इत्यादी राष्ट्रीय कार्यक्रमाची जनजागृती करणाऱ्या, राष्ट्रसंत गुरुदेव तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी संत गाडगे बाबाच्या दशसुत्री संदेशाने प्रेरीत होऊन शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेने केवळ समाजाकरीता तनमनधनाने आयुष्य वेचणाऱ्या, तळागाळातील गावखेड्याच्या,बहुजन समाजातील -गुरुवर्य श्री. सत्यपाल महाराज चिंचोलिकर रा.अकोट जि.वाशिम यांना महाराष्ट्र शासनाने,महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवांकित करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून सकल वैदर्भिय जनता व श्री सत्यपाल महाराजांच्या शिष्यमंडळींकडून होत असतांनाही,महाराष्ट्र शासन तळागाळातील,गोरगरीब,दारिद्री जनता व मुख्यत्वे करून बहुजन समाजावर हेतूपुरस्परपणे अन्याय करीत, वैदर्भिय गोरगरीब जनतेच्या भावना दुखवून, वेळोवेळी सच्च्या लोककलावंत व समाजसेवकांची दया माया न करता त्यांना त्यांच्या न्याय्यहक्कांपासून दूर लोटीत, मोठमोठ्या धनाढ्य,दिग्गज अशा चित्रपट क्षेत्रातील लोकांची, निःस्वार्थ समाजसेवकांच्या या पुरस्काराकरीता निवड करीत आहे. त्यामुळे तळागाळातील गोरगरीब लोककलावंत आणि बहुजन समाजातील समाजसेवकांमध्ये या शासनाविषयी असंतोषाचे वातावरण निर्माण होऊ पहात आहे.त्यामुळे "शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार धनदांडग्याना वितरीत करण्याचा निर्णया विरुद्ध आणि महत्वाचे म्हणजे शासनाच्या पुरस्कारा बाबत वेळोवेळी अक्षरशः जातियवाद करीत बहुजन समाजाला उपेक्षित ठेवण्या विरुद्ध विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांचेकडून उद्या, दि. 01 जानेवारी 2024 रोजी कारंजा तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात दुपारी 01:00 वाजता अचूक वेळेवर,सर्व लोककलावंत, समाजसेवक ,नागरीक व सर्वपक्षियांनी एकत्र येऊन शासनाचा निषेध व्यक्त करीत श्री सत्यपाल महाराज चिंचोलीकर यांना महाराष्ट्र भूषण जाहीर करण्याची मागणी करण्यात येणार असून,शासन बहुजन समाजाची दखलच घेणार नसेल तर आगामी सार्वत्रिक निवडणूकामध्ये कोणत्याही किर्तनकार, प्रवचनकार आणि लोककलावंतांनी राजकिय निवडणूकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेऊन शासनाला निवेदन देऊन स्पष्टपणे कळविण्यात येणार आहे. तरी सर्व लोककलावंत,समाजसेवक, सर्वपक्षिय कार्यकर्ते व नागरिकांनी गुरुवार दि 01 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 01:30 वाजता एकत्र येण्याचे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळ कारंजाचे विजय खंडार, प्रदिप वानखडे, उमेश अनासाने, विदर्भ लोककलावंत संघटनेचे संजय कडोळे यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....