कारंजा तालुका प्रतिनिधी(विजय भड)- शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी राष्ट्रीय व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते. त्याकरिता 25 जून पासून ऑनलाईन आवेदन पत्र भरने सुरू झाले आहे. ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत याआधी एकदा वाढवण्यात आली होती, आता परत दिलेल्या मुदत वाढीनुसार राष्ट्रीय पुरस्कार 15 जुलै पर्यंत व राज्य पुरस्कार 18 जुलै पर्यंत सादर करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांनी आपली आवेदने ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहे.
सदर प्रक्रिया दिनांक २५ जून २०२४ रोजी पासून सुरू झालेली आहे. परंतु या पुरस्कारासाठी वाशिम जिल्ह्यातील अतिशय कमी शिक्षकांचे ऑनलाईन प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव सादर करण्यासाठी यापूर्वी सुद्धा एकदा मुदत वाढ देण्यात आली होती.आता परत शिक्षण विभागाने मुदत वाढ दिलेली आहे. वाशिम जिल्ह्यात प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक व शिक्षक यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी 15 जुलै 2024 पर्यंत तर राज्य पुरस्कारासाठी 18 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपले आवेदन पत्र सादर करावीत. असे जिल्ह्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.
प्रतिक्रिया-
राजेंद्र शिंदे शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक जिल्हा परिषद वाशिम
वाशिम जिल्ह्यातील सदर शिक्षक पुरस्कारासाठी अत्यल्प प्रतिसाद आहे. त्यामुळे वाढलेल्या अंतिम मुदतीचा फायदा घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक यांनी प्रस्ताव सादर करावेत.