अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या लुईस ब्रेल वाचक व लेखनिक बँक अकोला च्या माध्यमाने प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात अंध विद्यार्थी एम.पी. एस.सी. गट-ब ची परीक्षा देत आहेत. *दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी जीएस कॉन्व्हेन्ट अकोला येथे अंध विद्यार्थिनी प्राजक्ता गणेशे ह्या विद्यार्थिनीची गट-ब ची परीक्षा होती आणि त्या परीक्षेसाठी लुइस ब्रेल वाचक व लेखनिक बँक अकोला तर्फे संध्या प्रजापती ह्या विद्यार्थिनीने लेखनिक म्हणून कार्य केले*. दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला द्वारा संचालित लुइस ब्रेल वाचक व लेखनिक बँक विदर्भातील पहिली अशी आगळीवेगळी बँक आहे, या माध्यमाने संपूर्ण भारतातील दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत वाचक, लेखनिक व मदतनीस पुरवले जात आहेत. सामाजिक तत्त्वावर निःशुल्क पद्धतीने ही बँक कार्य करीत असून संपूर्ण देशभरातील दिव्यांगांना शिक्षणाचे द्वार उघडे करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. भारताच्या विविध शहरात या बँकेच्या शाखा असून दरवर्षी या बँकेतील सदस्यांना प्रशिक्षण शिबिरा मार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वाचक, लेखनिक व मदतनीस म्हणून कार्य कसे करावे? या संदर्भात प्रशिक्षण दिले जाते. संस्थेतर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीत व ध्वनीमुद्रित शैक्षणिक साहित्य पुरवले जाते ज्या द्वारा विद्यार्थी आपला अभ्यास घर बसल्या करू शकतात. आपण सुद्धा देशाच्या कोणत्याही भागातून या संस्थेचे सदस्य होऊन दिव्यांगांना मदत करू शकता, ज्या दिव्यांगांना शिष्यवृत्ती पाहिजे आहे अशा दिव्यांगांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या हेल्पलाइन क्रमांक 9423650090 वर संपर्क साधावा असे आव्हान लुईस ब्रेल वाचक-लेखनिक बँक अकोला तर्फे करण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या बँकेच्या व्यवस्थापनासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे सदस्य प्रसाद झाडे, अनामिका देशपांडे, श्रीकांत कोरडे, प्रा. अरविंद देव संध्या प्रजापती, पूजा गुंटिवार, अक्षय राऊत,पावन मंगळे,विशाल भोजने, अंकुश काळमेघ, इत्यादी कार्य करीत आहेत .