वाशिम : भाजपाने यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रतिष्ठेची करून, महायुतीच्या सर्वच घटक पक्षाच्या पाठींब्यामुळे आणि सदर मतदार संघात त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीमुळे,महायुतीच्या उमेद्वार राजश्री पाटील (महल्ले) यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.आपण सदरहू निवडणूकी मध्ये उमेद्वारी अर्ज भरण्याची पाश्वभूमि पाहिली तर आपल्या लक्षात येईल की, निवडणूकीच्या रिंगणात नसलेल्या महायुतीच्या उमेद्वार ठरलेल्या भाग्यवान उमेद्वार,राजश्री पाटील (महल्ले) यांना देखील उमेद्वारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येलाच त्यांना उमेद्वारी जाहीर झाली असल्याची माहिती मिळाली.त्यामुळे एखाद्या व्यक्तीला अचानक करोडो रुपयांची लॉटरी लागून लक्ष्मीयोग प्राप्त होऊन अकस्मात धनलाभ व्हावा.त्याप्रमाणे खरोखरीच राजश्री पाटील यांना राजयोग प्राप्त होऊन,त्यांचे माहेर असलेल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. व या संधीचे सोने करण्याकरीता राजश्री पाटील यांनी त्यांना मिळालेल्या प्रचाराच्या अंत्यत कमी कालावधीमध्ये येथील मतदारांना, "मी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील तुमची लेक आहे. लेकीला कुणी परकं समजतं का ? त्यामुळे तुम्ही तुमच्या लेकीच्या पदरात मतदानाची भेट द्या. मी देखील मतदार संघाचा कायापालट करून विकासाला प्राधान्य देईल." अशी भावनिक साद घातली.तसेच उच्च विद्याविभूषीत राजश्री पाटील यांच्या सामाजिक कार्याचा व वक्तृत्वशैलीचा मतदारावर प्रभाव पाडण्यात त्या 100 % यशस्वी झाल्यात.असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.दि 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडल्यानंतर महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी दिलेल्या अंदाजानुसार सदर्हु निवडणूक चुरशीची वाटत असली तरीही मतदार संघातील पाटील समाज आणि बंजारा समाजाच्या गठ्ठा मतांमुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे मतदार संघात बोलले जात आहे.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.