हनुमान मंदिर कॅम्प एरिया येथे,दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा हनुमान जन्मोत्सव थाटात संपन्न झाला. सकाळी हनुमान मूर्तीचे दही-दुधाने अभिषेक करून पूजा करण्यात आले.दुपारी भजन व काल्याचा कार्यक्रम पार पडला. सांयकाळी *जागरण* हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.व रात्रौ महाप्रसाद (जेवण) देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी हनुमान उत्सव समिती च्या सर्व भक्तांनी अहो रात्रौ मेहनत घेतली.