कारंजा- तालुक्यातील दोनद बु. येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, रुग्णवाहीका लोकार्पन सोहळा दिनांक १८ फेब्रुवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. बच्चूभाऊ कडू यांचे प्रमुख उपस्थीतीत पार पडला. याप्रसंगी प्रहार कार्याध्यक्ष बल्लुभाऊ जवंजाळ,प्रहार नेते गजानन लोखंडकार,वाशिम जिल्हा संपर्क अध्यक्ष दत्तात्रय पाकधणे, प्रहार वाशिम जिल्हा अध्यक्ष तथा मानोरा नगर पंचायतचे अध्यक्ष हेमेंद्रभाऊ ठाकरे, प्रहार युवा जिल्हाध्यक्ष अमोल घुले पाटील आणि प्रहार कारंजा तालुक्यातील प्रहार सेवकांची लक्षनीय उपस्थीती होती. याप्रसंगी आरोग्य शिबीर,रक्तादान शिबीर दिव्यांग स्नेहमेळावा व अनुप ठाकरे यांच्या रूण्गवाहीकेचा लोकार्पन माननीय बच्चूभाऊ कडू यांचे हस्ते करण्यात आले.शहरी व ग्रामीण भागातील जनतेसाठी असलेल्या योजनेत होत असलेल्या भेदभावावर; शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर त्यांनी शासनास घरचा आहेर दिला.शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळण्याकरीता त्यांनी शासनावर सडकून टिका केली यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनीही आपले विचार मांडले.प्रहारचे जिल्हाध्यक्ष श्री.हेमेंद्रभाऊ ठाकरे यांनी सुद्धा आपल्या विचारातून कारंजा/मानोरा मतदारसंघ दीर्घकाळापासून स्थानिक आमदारापासून वंचित असल्याचे विचार मांडले व स्थानिक आमदार लाभत नसल्यानेच मतदारसंघ मागासला व शासकीय योजनापासून कोसो दूर राहिल्याचे मत मांडले.कार्यक्रमाचे संचालन गजानन अमदाबादकर यांनी केले.कार्यक्रमाला ग्रामस्थ व परिसरातील हजारो लोकांनी उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद राऊत यांनी केले.