आंतरराष्ट्रीय किंगडम युनिव्हर्सिटी फ्लोरीडा USA सी. बी. आय युनिव्हर्सिटी आफ्रिका तसेच रहेनुमा मल्टीपर्पज सोसायटी व लाईफ सोसायटी ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ०४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता अनिमेशन इंजिनिअरींग कॉलेज अमरावती येथे डॉक्टरेट व डि. लिट. पुरस्कार प्रदान कार्यक्रम सोहळा पार पडला.
यावेळी अमरावती येथील वि. उपजिल्हाधिकारी मा.अनिल भटकर सर, नांदेड येथील सिव्हील सर्जन डॉ. मोहम्मद जिलानी. माजी शिक्षक उपसंचालक डॉ. बी. जी. खोबरागडे, नरेंद्र गुळदेकर साहित्यीक अमरावती व फिल्म डायरेक्टर मा. विजय राऊत मुंबई तसेच आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक प्राध्यापक डॉ. अब्दुल अकील सर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व शुभ हस्ते सामाजिक व सांस्कृतिक, पत्रकारिता, साहित्य लेखन इत्यादी क्षेत्रात २० वर्ष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस मानद डॉक्टरेट उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये वाशिम जिल्ह्यामधुन कारंजा तालुक्यातील ग्राम उंबर्डा बाजार येथील पत्रकार, लेखक वसंत मारोटकर यांना मानद डॉक्टरेट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात “जय जय महाराष्ट्र माझा” या गीताने व दिप प्रज्वलनाने झाली. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती चिचखेडे मॅडम यांनी तर मास्टर विष्णु मारोटकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण केले. यावेळी देशातील विविध राज्यातुन पदाधिकारी उपस्थित होते. सामुहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.