वाशिम : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी हे आज 18 डिसेंबर पासून दोन दिवस जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. आज 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.40 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून मोटारीने वाशिमकडे प्रयाण. रात्री 10 वाजता वाशिम विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता वाशिम येथून मोटारीने मालेगांव तालुक्यातील बोराळाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता बोराळा येथे आगमन व अनुसूचित जातीच्या नागरीकांशी संवाद साधतील. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्याशी बोराळा प्रकरणावर चर्चा करतील. दुपारी 2 वाजता माध्यमांशी संवाद साधतील. दुपारी 3 वाजता वाशिम येथून मोटारीने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.