कारंजा लाड -- कारंजा तालुका व शहर पदाधिकारी सर्व अधिकृत संघटना, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना कळविण्यात येत आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार विधान सभेच्या अनुषंघाने राज साहेब ठाकरे यांचा अधिकृत वाशीम दौऱ्यानिमित्त विठ्ठलभाऊ लोखंडकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा वाशीम जिल्हा संपर्क प्रमुख, यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जिल्हा अध्यक्ष राजू पाटील किडसे,तसेच मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुख्य बैठकीचे व पक्ष प्रवेशाचे नियुक्त्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व सेल च्या सर्व कार्यकर्ते व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह कारंजा येथे दि 18 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी ठिक 11 30 वाजता वेळेवर आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन,आयोजक -महाराष्ट्र नवनिर्माण सेना कारंजा तालुका व शहर संघटनेतर्फे करण्यात आले आहे.