कारंजा (लाड) : दि. २५ व २६ एप्रिल रोजी,मंगळवार-बुधवारी झालेल्या चक्रिवादळाने ग्राम इंझोरी येथील ग्रामस्थाचे घरादाराचे व शेतशिवारातील फळबागा व भाजीपालाचे प्रचंड नुकसान झाले असून,अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली.भिंती पडल्यात. सौरऊर्जेचे पॅनल तुटून पडले. विजेचे खांब वाकले. झाडे उन्मळून पडलीत.शेतातील भाजीपाला पिके उध्वस्त झालीत.श्रीमती साळुंखेबाई राऊत महाविद्यालयाची टिनपत्रे व अनेक घरावरील टिनपत्रे तर पतंगा प्रमाणे दूरवर उडून गेली. व शाळेचे प्रचंड नुकसान झाले.वारंवार विजपुरवठा खंडीत होतो आहे.
व ग्रामस्थांना एकसाथ चक्रीवादळाचा,तुफानी हवेचा,गारपिटीचा मुसळधार पाऊसाचा व अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे इंझोरी परिसरात अक्षरशः गारांचा सडा दिसून येत असून बुधवारी उशिरा रात्री पर्यत पाऊस सुरूच आहे. ग्रामस्थांमध्ये या निसर्गाच्या कहराने चिंतेचे वातावरण दिसून येत असून, हिंदूबांधव मंदिरामध्ये देवाला प्रार्थना तर मस्जिदीमध्ये मुस्लिम बांधवाकडून नमाज पठन करून दुवा मागण्यात येत असल्याचे वृत्त आमचे प्रतिनिधी डॉ.कलिम मिर्झा यांनी कळविले असून, बळीराजावरील आसमानी संकट लक्षात घेऊन,शासनाने अजिबात विलंब न करता नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून,आर्थिक मदत करण्याची मागणी पुढे येत आहे.अशाच प्रकारचे नुकसान कारंजा व मानोरा तालुक्यातील अडाण नदी किनारी असलेल ग्राम वाकी वाघोळा,म्हसनी, दापुरा, कुपटा, जनुना इत्यादी ठिकाणी झाले असल्याचे वृत्त आमचे ठिकठिकाणचे वार्ताहर कळवीत असल्याचे वृत्त,महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला मिळाले असल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे.