कारंजा- वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना व अंशतः अनुदावर तत्वावर असलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही ती करावी अन्यथा पेपर तपासणी करण्यात येणार नाही. जर शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही, तर २ मार्च पासून सुरू होणाऱ्या दहवीच्या परिक्षेचे पेपर तपासनी वर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण संघर्ष संघटना जिल्हा वाशिमच्या वतीने निवेदन देण्यात आले.
उद्या २ मार्च पासून सुरू होण्याच्या इयत्ता दहावी व बारावी सुरु असलेल्या परीक्षेत पेपर तपासणी कामावर माध्यमिक शिक्षक यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचारी परंतु २००५ नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शाळांना शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारली आहे परंतु अशा कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय झालेला आहे. त्यांना २००५ पूर्वीची जुनी पेन्शन मिळावी यासाठी जुनी पेन्शन कोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटना मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम व माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांना इयत्ता दहावी व बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्या सदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे. यावेळी शिक्षण संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कवर,सचिव नितेश भिंगे,उपाध्यक्ष प्रविण कदम, कार्याध्यक्ष विजय भड,पी.बी देशमुख,व्ही. एस जमधाडे,के.एम कराळे, जी.एस दराळे,बी.आर डव्हळे,एस. एस सिरसाट उपस्थित होते. जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत पेपर तपासणी कामावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे,असे निवेदनात नमूद आहे. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे मुख्याध्यापक विजय भड यांनी कळवीले आहे .