वाशिम : जिल्हा पोलीस दलात रिक्त असलेल्या ६८ पोलीस शिपाई पदाकरीता मैदानी चाचणी घेण्यात आली आहे.
होती. मैदानी चाचणीमध्ये ७२० उमेदवार लेखीपरीक्षेकरीता पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता हॅपी फेसेस द कन्सेप्ट स्कुल, सेलु बाजार रोड, वाशिम येथे आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांचे लेखी परीक्षेकरीता ओळखपत्र www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षेचे ओळखपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. उमेदवारांनी लेखी परीक्षेकरीता येताना २ पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड व लेखी परीक्षेचे ओळखपत्र सोबत घेवुन यावे. असे जनसंपर्क अधिकारी यांनी कळविले आहे.