कारंजा : होळी हा भारतिय संस्कृतितील पावित्र्य आणि मांगल्याचा सण म्हणूनच संपूर्ण भारतात साजरा केल्या जात असून,या दिवशी कुप्रवृत्तीचे म्हणजेच वाईट वृत्तीचे दहन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे वृक्षाची होळी करण्यापेक्षा, आपल्यामधील वाईट वृत्ती आणि असत्य,दुर्व्यसन,दुर्व्यवहार,काम,क्रोध,लोभ,मोह,गर्व, अहंकार,मत्सर ईर्ष्या,द्वेश,निंदा इ.वाईट विकाराचा तसेच आपणास जडलेल्या व्यसनाचा त्याग करून त्याची होळी करण्याची आणि इमाने इतबारे सच्चाईने प्रामाणिकपणा कायम ठेवून सर्वांशी प्रेमाने सौजन्याने वागण्याची,आत्मसन्मानाने व आत्मविश्वासाने संमजस जीवन जगण्याची प्रतिज्ञा करून होळीचा सण साजरा करण्याचे आवाहन विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा तथा संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या सांस्कृतिक विभागाचे तालुका प्रमुख संजय कडोळे यांनी केले.

असून हिंसा करून तयार केलेला मांसाहार मानवी आहार नसून मनुष्याने आपला आहार शाकाहार ठेवला पाहीजे.तसेच दारू,मदिरा,भांग,गांजा, अफू,चरस हे आपले पेय नसून यामुळे डोके व हृदय भिन्न होऊन, विचारशक्ती,पचनशक्ती व शाररिक शक्तीचे त्यामुळे नुकसान होतो व वाईट सवयी म्हणजे दुर्व्यसने जडतात. म्हणून होळीच्या दिवशी दारू भंग गांजा पिण्यापेक्षा व मांसाहार हे राक्षसी अन्न खाण्यापेक्षा पुरणपोळी मिष्टान्नाचे जेवण व लिंबू शरबत थंड पेय घेऊन ,भजन,पूजन सत्संग करीत आणि एकमेकांवर त्वचेला हानिकारक रासायनिक रंग न टाकता कुंकू, हळद,अस्टगंध, बुक्का, गुलाल लावून एकमेकांना शुभेच्छा देऊन होळीचा सण स्मरणात राहील असा साजरा करण्याचे सुद्धा त्यांनी म्हटले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....