कारंजा : कारंजा तालुक्यातील ग्राम काजळेश्वर उपाध्ये ग्राम पंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी सतीष दादाराव वरघट यांची कारंजा तालुका ग्राम पंचायत अधिकारी संघटणेचे अध्यक्षपदी निवड झाल्याने काजळेश्वर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे . पंचायत भवन कारंजा येथे दि .१० जुलै रोजी त्यांची ग्रामपंचायत अधीकारी यांच्या आयोजीत सभेत कारंजा तालुका कार्यकारीणी निवड प्रक्रीया पार पडली .
ग्रामपंचायत अधीकारी संघटणेचे जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील; लेखा परीक्षक नरेश गजभिये; जिल्हासंघटक कु गोकर्ण जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत नवीन कार्यकारीनी निवडण्यात आली . अध्यक्षपदी सतीश वरघट ; उपाध्यक्ष कु वर्षा काकड; महेश राऊत; सचीव सचिन राठोड; कोषाध्यक्ष श्याम वेलूकार; प्रसिद्धी प्रमुख संजीव मनवर; संघटक मनोज मोहाळे; सल्लागार गजेंद्र पाखरे; लेखा परिक्षक दिपक रोकडे ;निमंत्रक कु .छाया टाके; कु वैशाली कांबळे; मानद अध्यक्ष देवा राठोड; कार्यकारी अध्यक्ष धनंजय चौधरी इत्यादीचा नवनिवार्चित कार्यकारीणीत समावेश आहे . सर्वांचे स्वागत बांबर्डा सरपंच मनीष कानकीरड; कारंजा तालुका सरपंच संघटणेचे अध्यक्ष तथा काजळेश्वरचे सरपंच नितीन पाटील उपाध्ये उपसरपंच तैसीम भाई; ग्रापं सदस्य हर्षल उपाध्ये; ख .वि .संचालक विनोद पाटील उपाध्ये राजगृपचे ओमप्रकाश वानखडे ; तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील उपाध्ये; सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुभाष उपाध्ये उपाध्यक्ष मुज्ज क्कीरभाई; माजी ग्रापं सदस्य जम्मु भाई; कल्लू भाई; गजानन भड; माजी मुख्याद्यापक मो शरफोद्यीन; सोनुभाई अब्रार शे. मुजम्मील; पीएल प्रणीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष अशोकराव उपाध्ये इत्यादींनी गावकऱ्यातर्फे केले आहे. विशेष म्हणजे सरपंच संघटणेचे तालूका अध्यक्षही काजळेश्वरचेच असल्याने हा दुग्ध शर्करा योग असल्याचे बोलले जात आहे .