कारंजा : संत गजानन महाराज यांचा ऋषीपंचमी निमित्त, मंगळवार दि. 19 सप्टेंबर 2023 रोजी पुण्यतिथी सोहळा असून, श्रींच्या भक्तांकरीता आणि वारकर्यांकरीता ही आनंदाची पर्वणी असते.त्या निमित्ताने श्रींच्या कारंजा शहरातील प्रत्येक श्री संत गजानन महाराज मंदिरात,सकाळपासूनच,श्रींच्या हजारो महिला पुरुष,वारकरी भक्तांची प्रचंड गर्दी उसळणार आहे.त्यानिमित्ताने सालाबादप्रमाणे अनेक ठिकाणी पालखी परिक्रमा,महाआरती,भजन, किर्तन,महाप्रसादाचे आयोजन सुद्धा असणार आहे.कारंजा शहरात शहर पोलीस स्टेशन परिसरातील श्री गजानन महाराज मंदिर,लोकमान्य नगर मधील श्री नागोबा बोकोबा येथील श्री गजानन महाराज मंदिर, ब्राम्हणसभा माळीपूरा येथील श्री गजानन महाराज मंदिर, ममतानगर, बालाजी नगर, वनदेवी नगर, सहारा कॉलेनी, तुषार कॉलेनी तसेच बायपास येथील प्रत्येक नविन वसाहती मध्ये श्री संत गजानन महाराजांचे शेकडो मंदिरे असून,कारंजा येथून दर आठवडा, दर एकादशी, दर पोर्णिमेला श्रीक्षेत्र शेगावची वारी अखंडपणे करणारा फार मोठा वारकरी समुदाय सुद्धा आहे. त्यामुळे ऋषीपंचमीला दरवर्षी प्रमाणे कारंजा शहरात भाविकांची यात्रा बघायला मिळणार आहे.स्थानिक शहर पोलीस स्टेशन स्थित मंदिरात दरवर्षी प्रमाणे प्रातःकाली श्रींच्या मुर्तिला महाभिषेक,सकाळी 11:30 ला महाआरती व दुपारी महाप्रसाद कार्यक्रम होणार असल्याचे वृत्त श्रींच्या सेवाधारी मंडळींच्या संवादातून मिळाले आहे.