कारंजा - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक एम.एड.कृती समितीचे राज्याध्यक्ष राजू जाधव यांचे मार्गदर्शनाखाली तसेच राज्य कोषाध्यक्ष तेजराव देशमुख व बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा.श्री रमेश यंगड यांचे प्रमुख उपस्थितीत दि.२९ आक्टों २२रोजी वाशिम जिल्ह्यातील एम.एड.प्राथमिक शिक्षक बांधवांची गुगल सहविचार सभा संपन्न झाली.
याप्रसंगी ऑनलाईन गुगल मिटिंगमध्ये राजू जाधव (राज्याध्यक्ष ) यांनी महाराष्ट्र राज्य एम एड कृती समितीची आजपर्यंतची वाटचाल आणि पुढील दिशा यासंदर्भात मार्गदर्शन केले.जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये कार्यरत असलेल्या उच्च शिक्षित प्राथमिक शिक्षक बांधवांना पदोन्नतीमध्ये प्राधान्य मिळावे या प्रमुख मागणीसाठी राज्यातील उच्च शिक्षित प्राथमिक शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे त्यासाठी सर्वांनी एका व्यासपीठावर येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राजू जाधव यांनी केले.
वाशिम जिल्ह्यातील एम एड व एम.ए. एज्युकेशन अर्हता प्राप्त प्राथमिक शिक्षक बांधवांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.सर्वानुमते अजय चव्हाण यांची वाशिम जिल्हाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली.सर्वांच्या वतीने संजय राठोड यांनी सूचना मांडली त्याला राजू मोरे व सतिश भिंगारे यांनी अनुमोदन दिले.
याप्रसंगी श्री गजानन गायकवाड,सतिश भिंगारे, दिलीप गाडे,मनोहर बाहे रंजीत जाधव,संतोष पट्टेबहादुर, अमोल ठोंबरे किशोर वाघ,दिलीप भोपळे,मुरलीधर जाधव, संतोष मोरे,श्री मित्रचंद वाटकर,कु.निरंजना संघई ,कु.जया खंडागळे, माधव करडखेले इत्यादी वाशिम जिल्ह्यातील शिक्षक बांधव ऑनलाइन उपस्थित होते.याप्रसंगी बुलढाणा जिल्हाध्यक्ष रमेश यंगड,सरचिटणीस सुनील इंगळे शिवाजी डोंगरदिवे,निलेश मगर बुलढाणा तसेच प्रमोद जाणोरकर अकोला यांनी मनोगत व्यक्त करून वाशिमचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजय चव्हाण यांचे अभिनंदन केले.गुगल मिटिंगचे सूत्रसंचालन राज्य कोषाध्यक्ष तेजराव देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन सतिश भिंगारे यांनी केले. असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेला पत्रकार गणेश बागडे यांनी दिल्याचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले .