ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे कित्येक वर्षापासुन राजरोसपणे, खुलेआम दारु विक्री होत असुन हळदा ग्रामपंचायत समोर येथे दारु किंग चार चाकी वाहणारे दारुचा पुरवठा करत असुनही संबंधित पोलीस विभागाकडुन कोणतीच कारवाई केली जात नसल्याने गावातील शांतता सुव्यवस्था व घराघरात भांडणे वाऱ्याच्या वेगाने वाढू लागले आहे. मिसरुड न फुटलेली तरुन मंडळी शाळा शिकणे सोडुन श्रमाविणा पैशा कमवण्याच्या नादात दारुचे वेसन जडल्याने स्वताचे आयुष्याची माती करत कित्येकांचे संसार उघड्यावर पडले असून सदर मेंडकी पोलिसांचे आशिर्वाद असल्याने हळदा येथील दारु किंग चार चाकी वाहणारे तमाम गावामध्ये पुरवठा करून अवैध दारू विक्री करतो अवैध दारुचा पुरवठा करत असुन मुजोरीची भाषा वापरत असल्याने गावात गावात स्वतः शाळेकरी मुलांना पैशाचे आमीष दाखवित दारु विक्रेते तयार केले असल्याने तरुन मंडळी आई-वडीलांना न जुमानता दारुचे व्यसन करता. त्यामुळे भविष्याची चिंता वाढली असुन चंद्रपूर जिल्हा तालुका पोलीस अधिकारी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन हळदा येथील चार चाकी वाहणाने अवैध दारुचा पुरवठा करणा-यावर कडक कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरीकाकडुन होत आहे