कारंजा [लाड] : स्वतंत्रता अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मागील १४ ऑगस्ट रोजी, कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे विकासपुरुष असलेले आमदार राजेंद्रजी पाटणी यांनी नगर परिषदेला भेट देऊन, कारंजा शहराच्या विकासाचा प्रस्ताव तयार करा . तुम्हाला १०० कोटी विकास निधी देतो असे आश्वासन, प्रथम श्रेणी मुख्याधिकारी दादारावजी डोलारकर यांना दिले होते. तेव्हा मुख्याधिकारी यांनी कारंजा शहराला खड्डेमुक्त रस्त्याचे शहर करण्याकरीता प्रस्ताव तयार करणे गरजेचे आहे. व बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वी, बाप्पाच्या विसर्जन मार्गावरील प्रत्येक रस्त्याचे डांबरीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. तसेच कृपा करून थातुर मातुर मुरूम टाकून रस्त्यातील खड्डे भरती करू नये. त्या ऐवजी डांबरीकरण व सिमेंट क्रांकिट द्वारे रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी कारंजेकर नागरिकांची रास्त अपेक्षा आहे. अशी मागणी कारंजा येथील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवक तथा पत्रकार संजय कडोळे यांनी व्यक्त केली आहे.